प्रशांत गडाख यांच्या आरोग्यासाठी शनिदेवाला नवस

सुखरूप घरी येण्यासाठी शनिदेवाला घातले साकडे
प्रशांत गडाख यांच्यासाठी शनिदेवाला नवस
प्रशांत गडाख यांच्यासाठी शनिदेवाला नवसई सकाळ

सोनई (अहमदनगर): मुळा एज्युकेशन संस्था व यशवंत प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत पाटील गडाख यांच्यावरील आरोग्य संकट लवकर हळो..असे साकडे शनिशिंगणापुर येथील शनिदेवाला घालण्यात आले आहे. गाव व परीसरातील युवक अनेक देवतांपुढे नतमस्तक होत प्रार्थना करुन आपल्या नेत्यांने सुखरूप घरी यावे असा नवस केला आहे. (Prayers for the health of Prashant Gadakh)

मागील पंधरवड्यात गडाख यांना कोरोना संसर्गाचा त्रास वाढल्याने मुंबईतील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तीन,चार दिवसापासून त्यांची प्रकृती खालावली आहे. सोशल मीडियावर त्यांच्या प्रकृतीविषयी पोस्ट पडल्यानंतर आज सोनईचे सरपंच धनंजय वाघ, व्यावसायिक महावीर चोपडा, कार्यकर्ते अभिषेक बारहाते, सनी गौर व गणेश लोंढे यांनी पायी शनिशिंगणापुरला जावून प्रकृती सुधारण्यासाठी शनिदेवाला साकडे घातले.

सोनई येथील श्री स्वामी समर्थ अध्यात्मिक केंद्रातील सेवेकरी मंडळाने आपापल्या घरी महामृत्यूंजय मंत्र जप, स्वामी चरित्र, माळजप व दीर्घ आयुष्यासाठी सेवा सुरु केली आहे. शंकरराव गडाख युवा मंचच्या युवकांनी त्रिलिंगी महादेव मंदीरात अभिषेक केला. राजेंद्र गुगळे मित्रमंडळाने माता वैष्णोदेवीला नवस केला आहे. उदय पालवे मित्र मंडळाने ग्रामदैवत जगदंबादेवीला प्रार्थना करीत गडाख यांना सौख्य लाभावे याकरीता प्रार्थना केली.

सोनईबरोबरच घोडेगाव, चांदा, लोहगाव, शिरेगाव, खरवंडी, मोरया चिंचोरे, कुकाणे, नेवासे, बेलपिंपळगाव येथील युवकांनी आपल्या गावातील ग्रामदैवतास गडाखांच्या आरोग्यासाठी प्रार्थना केली. मुस्लिम व ख्रिश्चन बांधवांनी आपल्या घरी कौटुंबिक प्रार्थना घेतली.(Prayers for the health of Prashant Gadakh)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com