कोरोना काळात बदल्यांचा आदेश नसतानाही फुल्ल फिल्डिंग

नगर जिल्हा परिषदेची एवढी तत्परता कशासाठी
jilha parishad
jilha parishadE sakal

नगर ः जिल्हा परिषदेतील विविध संवर्गांतील बदल्यांची प्रक्रिया दर वर्षी मे महिन्यात राबविली जाते. मात्र, कोरोनामुळे अद्याप शासनाने या बदल्यांची प्रक्रिया राबविण्यासाठी अध्यादेश दिलेला नसला, तरी प्रशासनाने बदल्यांची पूर्वतयारी करून ठेवलेली आहे. वाढत्या कोरोनात एवढी तत्परता प्रशासनाने कशाला दाखविली, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. (Preparations for Zilla Parishad transfers in Ahmednagar)

दर वर्षी जिल्हा परिषदेसह पंचायत समित्यांतील विविध संवर्गांतील कर्मचाऱ्यांच्या बदल्यांची प्रक्रिया राबविली जाते. सरकारने 15 मे 2014 रोजी तसा अध्यादेश काढलेला आहे. त्यानुसार प्रशासनाने बदल्यांची पूर्वतयारी करून ठेवलेली आहे. मागील वर्षीसुद्धा अशीच तयारी प्रशासनाने केलेली होती. त्यानंतर जुलैमध्ये बदल्यांचा अध्यादेश शासनाने जारी केल्यावर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. मात्र, मागील वर्षीपेक्षा यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आहे.

अशा स्थितीत अशा प्रकारची प्रक्रिया प्रशासनाने राबविणे चुकीचे असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. जिल्हा परिषदेसह पंचायत समितीतील काही कर्मचारी कोरोनाबाधित आहेत. कामकाज कमी कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत सुरू ठेवावे, असा जिल्हाधिकाऱ्यांचा अध्यादेश असतानाही, जिल्हा परिषदेत अधिकारी व कर्मचाऱ्यांना बोलावून अशी प्रक्रिया कशी राबविली, असा सवाल केला जात आहे.

अशी राबविली बदल्यांची प्रक्रिया

बदलीस पात्र कर्मचाऱ्यांची माहिती पंचायत समित्यांकडून मागविली. त्यावर हरकती मागवून पुन्हा यादी करण्यात आली. सेवाज्येष्ठता यादी प्रसिद्ध करण्यात आली. आता या कर्मचाऱ्यांचे समुपदेशन बाकी असून, राज्य सरकारकडून अध्यादेश येताच ही प्रक्रियाही पूर्ण केली जाईल.

जिल्हा परिषदेतील विविध संवर्गांतील कर्मचाऱ्यांच्या बदल्यांसंदर्भातील यादी तयार करून प्रसिद्ध करण्यात आली आहे. शासनाचा अध्यादेश प्राप्त होताच बदल्यांची प्रक्रिया राबविण्यात येईल.

- वासुदेव सोळंके, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, सामान्य प्रशासन

(Preparations for Zilla Parishad transfers in Ahmednagar)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com