कोरोनावर चिकन, मटण नि अंड्याचा फंडा

डॉक्टरांच्या सल्ल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाढले भाव
Prices of chicken, mutton, eggs increased
Prices of chicken, mutton, eggs increasedesakal

नगर तालुका ः कोरोनाकाळात रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी चिकन, मटण व अंडी असा सल्ला दिला जात आहे. त्यामुळे कडकडीत उन्हाळा असूनही चिकन, मटण व अंड्यांची मागणी वाढत आहे. त्यांचे दरही दुपटीने वाढले आहेत. ब्रॉयलर चिकनला 180 ते 240 रुपये, गावरान चिकनला तीनशे ते साडेतीनशे रुपये, मटण आठशे, तर एका अंड्यासाठी आठ ते दहा रुपये मोजावे लागत आहेत. विक्री वाढल्याने विक्रेत्यांना अच्छे दिन आले आहेत.

शेतीला जोडधंदा म्हणून शेळी व कुक्कुट पालन शेतकरी करत आहेत. जिल्ह्यात सुमारे आठ हजारांवर कुक्कुट शेड असून, चार कोटी पेक्षा जास्त पक्ष्यांची जोपासना केली जाते. एकट्या नगर तालुक्‍यात हजारापेक्षा जास्त पोल्ट्री शेडमधून पाच लाख पक्ष्यांचे पालन केले जाते. जिल्ह्यातून परदेशातही चिकन निर्यात केली जाते.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेपूर्वी चिकन दीडशे, तर मटण पाचशे ते साडेपाचशे रूपये किलोने विकले जात होते. तेच भाव आता कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत गगनाला भिडले आहेत. सध्या डॉक्‍टरांकडून चिकन, मटण, अंडी खाण्याच सल्ला दिला जात असल्याने महागाई वाढूनही चिकन, मटण अंड्यांचे भाव वाढले आहेत.

कोरोनाच्या पहिल्या लाटेत रुग्णांची संख्या कमी होती. त्यातच चिकन खाण्याबाबत गैरसमजही पसरले होते. दुसऱ्या लाटेत कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. डॉक्‍टर चिकन, मटण, अंडी खाण्याचा सल्ला देत असल्याने विक्रीत व किमतीत दुपटीने वाढ झाली आहे.
- इम्रान सय्यद, चिकन व्यावसायिक

कोरोनाबाधित रुग्णांची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्याची गरज असते. चिकन, मटण, अंड्यांतून मिळणाऱ्या प्रथिनांमुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. त्यामुळेच या काळात चिकन, मटण, अंडी खाण्याच सल्ला दिला जात आहे. त्याचा विक्रीवरही परिणाम झाला आहे.
- डॉ. राहुल पवार, नगर

बातमीदार - दत्ता इंगळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com