esakal | अतिवृष्टीने झालेल्या नूकसानीची दखल पंतप्रधानांनी घेतली; राज्यातील एकही मंत्री फिरकला नाही
sakal

बोलून बातमी शोधा

The Prime Minister took note of the damage caused by the heavy rains

अतिवृष्टीमुळे पिकांच्या झालेल्या नूकसानीचे गांभीर्य लक्षात घेऊन राज्य सरकारने पंचनाम्याची वाट न पाहता तातडीने मदत जाहीर करावी. 

अतिवृष्टीने झालेल्या नूकसानीची दखल पंतप्रधानांनी घेतली; राज्यातील एकही मंत्री फिरकला नाही

sakal_logo
By
सतीश वैजापूरकर

राहाता (अहमदनगर) : अतिवृष्टीमुळे पिकांच्या झालेल्या नूकसानीचे गांभीर्य लक्षात घेऊन राज्य सरकारने पंचनाम्याची वाट न पाहता तातडीने मदत जाहीर करावी. शेतकऱ्यांच्या खात्यात भरपाईची रक्कम जमा करावी, अशी मागणी माजी मंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.

ते म्हणाले, पावसाने राज्यातील सर्वच विभागात थैमान घातले. उभी पिके जमीनदोस्त झाली. शेतकरी हवालदिल झाला. दुहेरी अर्थिक संकटाचा सामना करण्याची वेळ त्याच्यावर आली. झालेल्या नुकसानीचे भीषण चित्र पाहीले तर सोयाबीन कांदा भाजीपाला कापूस ज्वारी तूर यासह गाळपासाठी आलेले ऊसाचे क्षेत्रही मोठ्या प्रमाणात बाधीत झाले. साखर कारखान्यांसमोरही गाळपाचे मोठे आव्हान उभे राहीले.

खरीप हंगामातील संकटातून शेतकरी सावरत असतानाच आता रब्बीची पेरणीही अतिवृष्टीमुळे वाया गेल्याने शेतकरी उद्ध्वस्त झाला. हे गांभीर्य लक्षात घेवून राज्य सरकारने आता पंचनाम्याची वाट पाहाता  सरसकट मदत जाहीर करून दुबार पेरणीसाठी शेतकऱ्यांना सहकार्य करावे.

यापूर्वी अवकाळी पावसाने शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणात नूकसान झाले. परंतू राज्य सरकारने फक्त पंचनामे करण्याचा फार्स केला. शेतकऱ्यांना कवडीचीही मदत केली नाही. राज्यात अतिवृष्टीने झालेल्या नूकसानीची दखल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली. परंतू राज्यातील एकही मंत्री झालेल्या नूकसानीची पाहाणी करण्यासाठी फिरकला नाही. शेतकऱ्यांचे अश्रू पुसायला सुध्दा वेळ नसलेल्या मंत्र्यांनी आता तरी बाहेर पडावे केवळ केंद्र सरकारकडे  बोट दाखवून आपली जबाबदारी झटकण्यापेक्षा आता तातडीने मदतीची घोषणा करावी.

संपादन : अशोक मुरुमकर