खासगी शाळेतील शिक्षक शेतीसह इतर व्यवसायांकडे वळाले

गौरव साळुंके
Tuesday, 28 July 2020

लॉकडाउन लागु झाल्यापासुन पगार थांबल्याने १२ वर्षापुर्वी बंद केलेले दुकान उघडण्याची वेळ कोरोनामुळे आली आहे.

श्रीरामपूर (अहमदनगर) : लॉकडाउन लागु झाल्यापासुन पगार थांबल्याने १२ वर्षापुर्वी बंद केलेले दुकान उघडण्याची वेळ कोरोनामुळे आली आहे. शिक्षणानंतर चप्पल विक्री व्यवसाय सुरु केला. परंतू चित्रकलेची आवड असल्याने एका खासगी शाळेत विद्यार्थ्यांना चित्रकलेचे धडे देतो. कोरोनामुळे शाळा बंद झाल्या.

परीक्षाही रद्द करण्यात आल्या. सध्या ऑनलाईन पद्धतीने शिकविणे सुरु आहेत. शाळा बंद असल्याने पालक शालेय शुल्क भरत नाही. त्यात सरकानेही शालेय शुल्क आकारणीसाठी सक्ती करु नये, अशा सुचना दिल्या. त्यामुळे खासगी शाळांनी शिक्षकांचे पगार थांबविल्याने आर्थिक अडचणीत आल्याचे खासगी शाळेतील शिक्षक सुधीर (बद्दलले नाव) यांनी सांगितले.

शहरासह तालुक्यात ३० ते ३५ खासगी शाळा असुन त्यात ६०० हुन अधिक शिक्षक कार्यरत आहे. त्यातील अनेक शिक्षक घरी राहुन सध्या आॅनलाईन धडे शिकवत आहे. त्यांना नियमित पगार मिळत नसल्याने ते आर्थिक अडचणीत आले आहे. ६०० शिक्षकांपैकी २५० शिक्षक मध्यमवर्गीय कुटूंबातील असल्याने त्याचा उदर्निर्वाह पगारावर चालतो. सध्या शाळा बंद असल्याने पगार थांबले.

परिणामी कुटुंबांचा उदर्निवाह चालविण्यासाठी काही शिक्षक व्यवसायासह शेतीकडे वळाले आहे. शहरातील एका खासगी शाळेत चित्रकला शिकविणारे शिक्षकांने आता मुळगावी जावुन १२ वर्षापुर्वी बंद केलेल चप्पल विक्रीचे दुकान सुरु केले आहे. तर काही शिक्षकांनी लाॅकडाउनमध्ये आंब्याची विक्री करुन घर सांभाळले. तर काही शिक्षकांनी शहरात भाजीपाला विक्रीचा व्यवसाय सुरु केला.

घरी राहुन विद्यार्थ्यांना स्मार्टफोनच्या आधारे आॅनलाईन शिकवुन विद्यार्थ्यांची ज्ञानाची भुक भागेल परंतू शाळेकडुन पगार मिळत नसल्याने शिक्षकांच्या पोटाची भुक कशी भागणार. कुटूंबाचा उदर्निवाह चालविण्यासाठी काम केल्याशिवाय पर्याय नाही. आॅनलाईन शिकवणीचा पगार मिळत नसल्याने घर कसे चालवावे, असा सवाल चित्रकला शिक्षक सुधीर (बद्दलले नाव) यांनी केला आहे.   

अनेक खासगी शाळांनी शिक्षकांचे पगार थकविले आहे. आॅनलाईन शिक्षण प्रणालीत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे. आॅनलाईन शिक्षणासाठी ग्रामीण भागात अनेक अडचणी असुन कनेक्टिवीटी उपलब्ध नाही. आॅनलाईन शिक्षणासंदर्भात सरकाने मार्गदशिका तयार करावी. खासगी शाळेतील शिक्षकांचे पगार थकल्याने सध्या त्यांना उपासमारीचा समाना करावा लागत आहे. 
- जितेंद्र भोसले, शेतकरी संघटना कार्यकर्ते

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Private school teachers turned to other occupations including agriculture