बिरोबाच्या होईकाने वाढवली काळजी, कोरोना, युद्ध, शेतीविषयी झाली भविष्यवाणी

Hoika's prophecy is a headache
Hoika's prophecy is a headache

नगर तालुका ः ग्रामीण भागात दिवाळी आणि उन्हाळ्यात बहुतांशी गावांत होईक (भविष्यवाणी) केली जाते. प्रत्येक गावात आपापल्या ग्रामदैवतांना साकडे घातले जाते. तेथील परंपराही वेगळी असते. 

नगर तालुक्यातील निमगाव वाघा गावातील बिरोबा देवस्थानचे होईक झाले. त्या होईकातील दिलासादायक घटना म्हणजे शेतीला बरकत मिळेल, असं सांगितलं जातं. मात्र, कोरोनाबाबत जरा काळजी करायला लावणारी ही भविष्यवाणी आहे. सर्व जग लस कधी येईल याची वाट पाहत आहे. त्यातच ही भविष्यवाणी आल्याने ती काळजी वाढवणारी आहे.

तालुक्‍यातील निमगाव वाघा येथील प्रसिद्ध बिरोबा देवस्थान येथे "होईका'चा कार्यक्रम रविवारी (ता. एक) पार पडला. देवाचे भगत नामदेव भुसारे यांनी "होईक' (भविष्यवाणी) सांगताना, पुढील वर्षी येणाऱ्या संकटाचे स्पष्टीकरण दिल्याने अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला. कोरोना महामारीचे संकट अजून आठ महिने राहणार आहे. देशात मोठ्या चळवळीचे भाकीत त्यांनी सांगितले. युद्धाची शक्‍यताही वर्तविली आहे.

शेतीला व लक्ष्मीला पीडा नसल्याचे सांगितल्याने, उपस्थितांनी सुटकेचा नि:श्‍वास सोडला. भुसारे "होईका'त म्हणाले, की दाही खंडांमध्ये रक्ताचा पूर वाहणार, म्हणजे युद्ध होणार आहे. आभाळ फिरून ज्वारीच्या पिकाला अपकार होईल. कपाशीला 7 ते 9 हजार क्विंटल, ज्वारी 2500 ते 2700 रुपये, सोन्याला 40 ते 54 हजारांचा भाव राहील. गहू- हरभऱ्याचे मनभाव राहणार असल्याचे सांगितले.

पुढील आषाढी कठीण जाईल व मूग-राळ्याची पेर होऊन घडमोड होईल. भविष्यवाणी ऐकण्यासाठी पंचक्रोशीतील भाविकांनी कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर नियमांचे पालन करीत हजेरी लावली होती. 
"होईक' कार्यक्रमाचे आयोजन बाबा जाधव, गोकुळ जाधव, अन्शाबापू शिंदे, बाबा पुंड, बबन कापसे, संजय डोंगरे, रावसाहेब भुसारे, बशीर शेख, अरुण कापसे यांनी केले. भाविकांसाठी गावात भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. 
या होईकावर परिसरातील भाविकांची श्रद्धा आहे.

संपादन - अशोक निंबाळकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com