
जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांसह पदाधिकाऱ्यांची निवासस्थाने जुनी झाल्याने तिथे नव्याने ती उभारण्यात येणार आहेत.
अहमदनगर : जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांसह पदाधिकाऱ्यांची निवासस्थाने जुनी झाल्याने तिथे नव्याने ती उभारण्यात येणार आहेत. ही कामे घसारा निधीतून करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात आलेली आहे. परंतु त्याला शासनाची मंजुरी घेणे गरजेचे असल्यामुळे तो प्रस्ताव करून शासनदरबारी पाठविण्यात आलेला आहे. शासनाची मंजुरी मिळाल्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरवात होणार आहे.
नगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
शहरातील लालटाकी परिसरात जिल्हा परिषदेची जागा असून तेथे अधिकारी व पदाधिकारी यांची निवासस्थाने आहेत. या निवासस्थानांची दुरवस्था झालेली आहे. त्यामुळे तेथे नव्याने इमारती उभ्या राहण्यासाठी जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांचे अनेक वर्षांपासून प्रयत्न सुरु आहेत. त्या प्रयत्नांना अखेर यश आलेले आहे.
लालटाकी परिसरात अधिकारी व पदाधिकाऱ्यांची निवासस्थाने ही बिओटी तत्वावर बांधण्याचा विचारही सुरवातीला आला होता. मात्र तो नामंजूर झाला होता. मात्र आता ही निवासस्थाने घसारा निधीतून उभारण्याचा प्रस्ताव तयार केला. त्याला सर्व सदस्यांनी सर्वसाधारण सभेत मंजुरी दिलेली असून शासनाने हे काम करण्यास परवानगी दिल्यानंतर लगेच सुरु होणार आहे.
संपादन : अशोक मुरुमकर