
विज वितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे शेतकरी मेटाकुटीस आला आहे.
टाकळी ढोकेश्वर (अहमदनगर) : विज वितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे शेतकरी मेटाकुटीस आला आहे.कृषी पंपाना रात्रीची विज न देता दिवसाच पुर्ण दाबाने विज द्या अन्यथा शेतक-यांन समवेत आंदोलन करणार असल्याचा ठराव भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या बैठकीत घेण्यात आला असल्याची माहीती संघटनेचे संस्थापक संतोष वाडेकर यांनी दिली.
मांडओहळ(ता.पारनेर) येथे संघटनेच्या पदधिका-यांची बैठक पार पडली. यावेळी अशोक आंधळे,अमोल ऊगले,संतोष हांडे, संतोष कोरडे,संतोष वाबळे,सिताराम देठे,दत्तात्रय हांडे,राजु रोकडे,माऊली गागरे उपस्थित होते.
वाडेकर म्हणाले,विज वाहक तारा पुर्णत: जिर्ण झालेल्या असल्यामुळे केव्हांही तुटुन पडत आहेत यामुळे अतापर्यंत असंख्य शेतक-यांना,पशुंना आपला जीव गमवावा लागला आहे.कोविड 19 या आजाराच्या महामारीमुळे शेतीमालाच्या बाजारभावावर परीणाम होऊन शेतकरी पुर्णतः हवालदिल झाला असतानाच अतिवृष्टिमुळे शेतीपिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकरी असमानी संकटांचा सामना करत असतानाच वीज वितरण कंपनीच्या गलथान कारभारा मुळे सुलतानी संकटांचा सामना करावा लागत आहे.
संपादन : अशोक मुरुमकर