esakal | पब्जीला स्वदेशी पर्याय फौजी, अक्षयकुमारही म्हणतोय ही समाजसेवा आहे करा डाऊनलोड
sakal

बोलून बातमी शोधा

Fau G game is coming, Akshay Kumar says download

हॅलो ऐप बंद झाल्यानंतर शेअर चॅट नावाचे देशी अॅप आले. त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. आता या फौजीलाही प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे. कारण अक्षयकुमारने हा गेम भारताच्या आत्मनिर्भर चळवळशी निगडित असल्याचे म्हटले आहे. त्याबाबत त्याने ट्विट केले आहे. ते पंतप्रधान मोदींना त्याने टॅग केले आहे.

पब्जीला स्वदेशी पर्याय फौजी, अक्षयकुमारही म्हणतोय ही समाजसेवा आहे करा डाऊनलोड

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नगर ः मोदी सरकारने विविध चिनी अॅपवर बंदी घातली आहे. त्यात टिकटॉक, पब-जीसारख्या लोकप्रिय गेमचाही समावेश होता. या निर्णयाचे विविध स्तरातून स्वागत होत आहे. मात्र, जे रात्रंदिवस मोबाईलवरच गेम खेळत असतात, त्यांना पोटदुखी सुरू झाली आहे.

टिकटॉक हे मनोरंजन अॅप होते. मात्र, पब-जी सारख्या अॅपमुळे अनेक मुलांचे मानसिक संतुलन बिघडले. त्यामुळे सामाजिक प्रश्न निर्माण झाला होता. हे अॅप बंद झाल्यामुळे चीनसारख्या शत्रू देशाच्या अर्थव्यवस्थेलाही फटका बसेल असे अर्थतज्ज्ञांचे मत आहे. मोदी सरकारचा हा हेडशॉट होता.

पब-जी किती घातक गेम असला तरी त्याची लोकप्रियता मोठी आहे. त्यामुळे एका भारतीय कंपनीने नवीन गेम लॉंच केला आहे. या गेमच्या प्रमोशनसाठी अभिनेता अक्षयकुमार सरसावला आहे. फौजी (FAU-G) या नावाने ही गेम आली आहे. फिअरलेस अँड युनायटेड गार्ड्स या नावाचे ते संक्षिप्त स्वरूप आहे.

हेही वाचा - कर्जतला पवारांनी उभारलं कोविड सेंटर

हॅलो ऐप बंद झाल्यानंतर शेअर चॅट नावाचे देशी अॅप आले. त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. आता या फौजीलाही प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे. कारण अक्षयकुमारने हा गेम भारताच्या आत्मनिर्भर चळवळशी निगडित असल्याचे म्हटले आहे. त्याबाबत त्याने ट्विट केले आहे. ते पंतप्रधान मोदींना त्याने टॅग केले आहे.

हा नवीन गेम लाँच होण्यासाठी आणखी किमान दोन महिने लागू शकतात. हा गेम डाऊनलोड झाल्यानंतर संबंधित कंपनीला पैसे मिळतात. या कंपनीच्या उत्पन्नातून २० टक्के वाटा भारत के वीर या ट्रस्टला दिला जाणार आहे. एकंदरीत फौजी डाऊनलोड केल्यानंतर देशाची सेवाच होईल, असे अक्षयकुमारचे ट्विट सांगते. सोशल मीडियात अक्षयकुमारच्या या ट्विटची चर्चा सुरू आहे. त्याच्या या ट्विटचा सोशल मीडियात समाचार घेतला जात आहे. यात कुठे आहे स्टार्टअप आणि आत्मनिर्भर चळवळ असाही त्याला सवाल केला जात आहे.

संपादन - अशोक निंबाळकर

loading image