युवकांना रोहित पवारांमुळे उभारी

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा घराघरांत रुजलेला पक्ष
ahmednagar
ahmednagarsakal

सिद्धटेक : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा घराघरांत रुजलेला पक्ष आहे. खास करून युवा वर्ग या पक्षाकडे बहुसंख्येने आकर्षिला जात आहे. पक्षाकडून त्यांच्याविषयी असलेली ध्येयधोरणे अधिकाधिक विकसित होत आहेत. त्यामुळेच तळागाळातील युवकांना आमदार रोहित पवार यांच्यामुळे उभारी मिळत असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नामदेव राऊत यांनी केले.

आमदार रोहित पवार यांच्या आगामी वाढदिवसानिमित्त आयोजित आरोग्य सप्ताहाच्या निमित्ताने भांबोरे येथील रक्तदान शिबिराचे उद्‌घाटन राष्ट्रवादीचे युवा नेते तुषार थोरात यांच्या हस्ते झाले. त्या कार्यक्रमात राऊत बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर प्रथमच व्यासपीठावरून बोलताना त्यांनी रक्तदान करण्यासाठी उपस्थित तरुणांना मार्गदर्शन केले.

यावेळी त्यांनी त्यांचा पूर्ण राजकीय जीवनपट उलगडून दाखवला. भांबोरे गणातील युवकांना बरोबर घेऊन कार्यक्रमाचे आयोजन केल्यामुळे सागर लोंढे व त्यांच्या सहकाऱ्यांचे त्यांनी कौतुक केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सभापती अश्विनी कानगुडे होत्या. राष्ट्रवादी युवक कॉँग्रेसचे तालुकाध्यक्ष नितीन धांडे, विजय मोढळे, गुलाब लोंढे, दिलीप हंडाळ, अॅड. सुरेश शिंदे, श्याम कानगुडे, अमोल भोसले, सतीश मोरे, राजेंद्र परकाळे आदी उपस्थित होते. राष्ट्रवादी युवकचे तालुका उपाध्यक्ष सागर लोंढे यांनी प्रास्ताविक केले. युवकचे जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र पांडुळे यांनी सूत्रसंचालन केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com