कोहकडी विविध कार्यकारी सेवा संस्थेच्या अध्यक्षपदी रामदास चौधरी तर उपाध्यक्षपदी संभाजी टोणगे

मार्तंड बुचुडे 
Sunday, 18 October 2020

अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीसाठी नुकतीच संचालक मंडळाची बैठक झाली.  या बैठकीत ही निवड बिनविरोध करण्यात आली.

पारनेर (नगर)  : कोहकडी विविध कार्यकारी सेवा संस्थेचे अध्यक्ष आशा जांभळकर व उपाध्यक्ष संपत टोणगे यांनी राजीनामा दिल्याने त्यांच्या जागेवर नवीन पदाधिका-यांची निवड नुकतीच झाली. यावेळी संस्थेच्या अध्यक्षपदी रामदास चौधरी तर उपाध्यक्षपदी संभाजी टोणगे यांची एकमताने निवड करण्यात आली.

अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीसाठी नुकतीच संचालक मंडळाची बैठक झाली.  या बैठकीत ही निवड बिनविरोध करण्यात आली. यावेळी अध्यक्षपदी चौधरी यांच्या निवडीची सुचना बबई गायकवाड यांनी केली.  त्यास संतोष कोपनर यांनी अनुमोदन दिले. तर उपाध्यक्षपदी संभाजी टोणगे यांच्या नावाची सुचना नामदेव गोगडे यांनी केली.  त्यास तुळशीराम गायकवाड यांनी अनुमोदन दिले. 

यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून आर.बी. वाघमोडे व सचिव बी.एस.वेताळ यांनी काम पाहिले. या पदाधिकाऱ्यांची निवड होताच पेढे वाटून फटाक्यांच्या आतषबाजीने त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. निवडी नंतर रत्नेश्वराच्या सभामंडपात बैठक झाली.  या वेळी विठ्ठल चौधरी,  माजी सरपंच जयवंत गायकवाड, राजेंद्र गोगडे तसेच सरपंच डॉ.साहेबराव पानगे यांनी पुढील काळात चांगले काम करावे म्हणून शुभेच्छा दिल्या.

या वेळी डॉ. पानगे म्हणाले, राजकीय हेवे दावे बाजूला सारून गावाच्या एकोप्यासाठी, सामाजिक विकासासाठी यापुढील काळात माजी सभापती सुदाम पवार व आमदार निलेश लंके यांच्या मार्गदर्शना खाली काम करण्याचा निर्णय केला. यावेळी किसन पवार, सतिश थोरात, लहानु चाबुकस्वार, किसन चौधरी, विठ्ठल चौधरी, गणेश चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते. 

संपादन - सुस्मिता वडतिले


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ramdas Chaudhary has been elected as the President of Kohkadi Various Executive Services Organization at Parner