esakal | चार दिवस रोज पाच तास वेळ देऊन चिमुकलीने काढली रांगोळी
sakal

बोलून बातमी शोधा

The Rangoli by giving five hours time every day four days

चार दिवस रोज पाच तास वेळ देऊन २० तासात भव्य अशी रांगोळी काढून संपदा संदेश मोरे हिने लहानपणीची तिची प्रबळ इच्छा व्यक्त केली.

चार दिवस रोज पाच तास वेळ देऊन चिमुकलीने काढली रांगोळी

sakal_logo
By
शांताराम काळे

अकोले (अहमदनगर) : चार दिवस रोज पाच तास वेळ देऊन २० तासात भव्य अशी रांगोळी काढून संपदा संदेश मोरे हिने लहानपणीची तिची प्रबळ इच्छा व्यक्त केली. अकोले येथील कुमारी संपदा मोरे ही आर्किटेक्चर म्हणून शेवटच्या वर्षात शिकत आहे. 

तिला आर्टची आवड आहे. दुसरीत असताना तिला तिच्या आई- वडिलांनी पुणे येथे शिवराज्याभिषेक सोहळा रांगोळीतून साकारलेला पाहायला नेले होते. त्यावेळी या बालमनावर त्याचा परिणाम होऊन आपणही असेच काही तरी भव्य करू आणि तिच्या मनातील सुप्त इच्छा तिने आर्किटेक्चरकडे झेप घेत या गणेशोत्सवात कोरोनामुळे घरीच असल्याने रोज पाच तास मेहनत करून भव्य अशी गणेशमूर्ती साकारून आपल्या कलेचा अविष्कार दाखविला. 

सोशल मीडियावर तिचे वडील संदेश मोरे यांनी ही रांगोळी टाकताच तिच्या या रांगोळीला हजारो लाईक काही तासात मिळाल्या आहेत. तिला यासाठी आई, वडील व दादा सुयश यांची प्रेरणा मिळाली. तिच्या रांगोळीची फ्रेमही तयार करण्यात आली. संगमनेर अकोले येथे तिच्या या फ्रेमला मागणी वाढू लागली आहे. आपली मनात ठरविलेली कला एक तपानंतर रांगोळीद्वारे व्यक्त करता आली हे विशेष. यापुढेही आपण यापेक्षा मोठी रांगोळी व शिव राज्यभिषेक महासोहळा देखील काढू असा आत्मविश्वास तिने व्यक्त केला. वडील संदेश यांनी आपल्या मुलीने वीस तास मेहनत करून श्रींची मूर्ती रांगोळीतून साकारली याचा आम्हाला अभिमान आहे.

संपादन : अशोक मुरुमकर