दोन नगरसेवकांवर खंडणीचा गुन्हा

पारनेरची घटना; व्यवसायासाठी पैशांची मागणी
खंडणीचा गुन्हा
खंडणीचा गुन्हाSakal

पारनेर - ट्रकचा व्यवसाय करण्यासाठी दरमहा पंधरा हजार रूपयांची मागणी केल्याप्रकरणी पारनेर नगरपंचायतीचे शिवसेनेचे नगरसेवक युवराज पठारे, शुभम देशमुख यांच्यासह मयूर चौरे, गणेश पठारे यांच्याविरुध्द खंडणीसह मारहाणीचा पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रवीण गायकवाड (रा. तराळवाडी ता. पारनेर) यांनी फिर्याद दाखल केली आहे.

१ एप्रिल २०२१ रोजी ट्रकमध्ये एमआयडीसी येथे फिर्यादी माल भरण्यासाठी निघाले होते. कन्हेर ओहळ येथे युवराज पठारे व शुभम देशमुख (रा. पारनेर) हे त्यांना भेटले. ‘तुला जर तुझी वाहने चालवायची असतील तर पंधरा हजार रूपये महिन्याप्रमाणे आम्हाला हप्ता द्यावा लागेल. हप्ता दिला नाहीस तर तुला वाहने चालू देणार नाही, असे दोघे फिर्यादीस म्हटले. त्यानंतर १५ एप्रिलला पुन्हा पैशांची मागणी केली. त्यावेळीही दोघांनी दमदाटी केल्यानंतर शुभम देशमुख यांच्या फोनवर वेळोवेळी १ लाख ८७ हजार ५०० रूपये पाठविले.

एप्रिल २०२२ चा हप्ता दिला नाही म्हणून युवराज पठारे याने १३ मे रोजी मोबाईलवरून संपर्क करून पैशांची मागणी केली. त्याच दिवशी फिर्यादी देवीभोयरे फाटा येथून ट्रक ( एम. एच. १६, सी. सी. ७१३३ ) घेऊन मुंबईकडे निघाले होते. यावेळी युवराज पठारे, शुभम देशमुख, मयुर चौरे व गणेश पठारे यांनी ट्रक अडवून मारहाण व दमदाटी केली. यावेळी देशमुख याने खिशातील ३० हजार रूपये, गळ्यातील चेन काढून शिविगाळ करत चेकबुकही काढून घेतले. पैसे दिले नाही तर जीवे मारु, वाहने चालू देणार नाही, अशी धमकी दिली. यानंतर पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी फिर्यादी गेले असता पोलिस निरीक्षक घनश्याम बळप उपस्थित नसल्याने नगर येथे उपविभागीय पोलिस अधिकारी अजित पाटील यांच्याकडे तक्रार अर्ज दाखल केला होता.

या तक्रार अर्जाची चौकशी झाल्यानंतर फिर्याद दाखल दाखल करण्यात आल्याचे गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे. युवराज पठारे हे शिवसेनेचे नगरसेवक आहेत. त्‍यांच्‍यावर मागील आठवड्यातच तालमीतील पैलवानाला व त्‍याच्‍या पालकांना मारहाण केल्‍याचा गुन्हा दाखल आहे. लागोपाठ दोन गुन्हे दाखल झाल्‍याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. त्‍यांच्‍या समर्थकांकडून या गोष्टींमध्ये राजकारण असल्‍याचा आरोप केला जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com