कोरोनाच्या संकटात दिवाळी अंकाना वाचकांची पसंती

Readers prefer Diwali Ankana in Corona crisis
Readers prefer Diwali Ankana in Corona crisis

श्रीरामपूर (अहमदनगर) : कोरोनामुळे संकटात निर्माण झालेल्या आर्थिक मंदीमुळे यंदा दिवाळी अंकाच्या प्रती कमी प्रमाणात प्रसिध्द झाल्याने मागणी अधिक आणि पुरवठा कमी अशी परिस्थिती येथील बाजारात निर्माण झाली आहे. यंदा दिवाळी अंकाची मागणी कमी असेल अशी भिंती वाटत होती. परंतू दिवाळी निमित्त साहित्यिक व्यवहारात सध्या उत्साहाचे वातावरण आहे. 

दिवाळी अंकाच्या परंपरेला यंदा 113 वे वर्ष पुर्व होत आहेत. दिवाळी अंक अंसख्य वाचकांसह बुध्दवंताची वैचारीक समृध्दी वाढवण्याचे कार्य करते. मराठी वाड्मयीन विश्वात तर दिवाळी अंकानी साहित्यीकाच्या अनेक पिढ्या घडवल्या. राज्यभरात सुमारे तीन हजार अंक प्रकाशीत होतात. सध्या आॅनलाईन दिवाळी अंकानाची मागणी वाढली असल्याचे येथील प्रमुख वृत्तपत्र वितरक मयुर विजय पांडे यांनी सांगितले.

वाचक, लेखक, प्रकाशक, कामगार अशी सर्वांची पिढीच्या पिढी दिवाळी अंकांनी बांधून ठेवली आहे. दिवाळी अंकांची संख्या शंभरानी घटली आहे. कोरोनामुळे अंक कमी, तसेच प्रसिध्द झालेल्या अंकांची पृष्ठसंख्या कमी त्यामुळे प्रसिध्द झालेल्या अंकाची मागणी वाढल्याचे पांडे यांनी सांगितले. दिवाळी पुर्वी प्रत्येकजण फराळाबरोबरच साहित्याच्या फराळाची आतुरतेने वाट बघतो. दिवाळी अंकाना 113 वर्षाची परंपरा लाभली असल्याने महाराष्ट्राच्या संस्कृतीत दिवाळी अंकाचे योगदान आहेत. दिवाळीत फटाके, रांगोळ्या, फराळाचे पदार्थ आणि वाचन प्रेमीसाठी दिवाळी अंकांच्या मेजवाणीने अक्षर दिवाळी साजरी करतात. आपल्याला अभिप्रेत दिवाळी अंक हाती पडण्यासाठी वाचकांची दिवाळीच्या उत्सुकतेने वाट पाहतात. विविध विषयाचे दिवाळीअंक बाजारात आले आहेत. 

दिवाळी अंक नेहमीच मराठी वाचकांच्या कक्षात रुंदावणारे ठरले. येथील साहित्य हे तत्कालिन प्रगल्भ चळवळीतून नेहमिच समोर येत राहिले. दिवाळी अंकांनी हक्काचे व्यासपीठ मिळवून दिले.

आरोग्य, ज्योतिष्य, रहस्यकथा, चित्रपट, पर्यटन, अध्यात्मिक, पापपूर्ती अशा विविध विषयांना वाहलेले स्वतंत्र अंक प्रकाशित होत आहे. ललित साहित्य, वैचारिक आणि पुरोगामी साहित्याच्या अंकांपेक्षाही आरोग्य, ज्योतिष्य आणि आध्यात्मिक विषयाच्या दिवाळी अंकांचा खप दरवर्षी वाढत असल्याचे किशोर पांडे यांनी सांगितले.

दैनिकांमधील साप्ताहिक सकाळ, सरकारनामा, लोकसत्ता, महाराष्ट्र, दिपोत्सव, सामना साप्ताहिक साहित्यामध्ये चित्रलेखा, लोकप्रभा यांच्या अंकांत विविध विषयांची मांडणी केली आहे. शेतीविषयक अ‍ॅग्रोवन, उद्योजक यांचे दिवाळी अंक बाजारात आले आहे. विनोदी अंकांचा बादशाह आवाज, जत्रा, हासवंती, शामसुंदर हे कंही आले आहेत.

संपादन : अशोक निंबाळकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com