
अहमदनगर : कोरोनाबाधित रुग्णांमध्ये विक्रमी वाढ
अहमदनगर : जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून कोरोना बाधितांचा आकडा वाढत आहे. गेल्या अनेक दिवसातील विक्रमी बाधितांचा आकडा आज (मंगळवारी) आला आहे. दिवसभरात तब्बल २०४५ जण बाधित आढळून आल्याने सर्वांनीच धसका घेतला आहे.
हेही वाचा: UP Election : मालेगाव स्फोटातील आरोपीची उमेदवारी 'जदयू'कडून मागे!
जिल्ह्यात आज अखेर तीन लाख ७६ हजार ३५७ जण बाधित आढळून आलेले आहेत. त्यातील तीन लाख ५७ हजार ७१८ जण बरे होऊन घरी परतलेले आहेत. सध्या ११ हजार ४६६ जणांवर उपचार सुरु आहेत. आजअखेर सात हजार १७३ जणांचा मृत्यू झालेला आहे. जिल्ह्यातील ९२६ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९५.०५ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत २०४५ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ११४६६ इतकी झाली आहे.जिल्हा रुग्णालयाच्या तपासणीत ७०५, खासगी प्रयोग शाळेतील तपासणीत १०६६ तर ॲंटीजेन चाचणीत २७४ रुग्ण बाधीत आढळले आहेत.
हेही वाचा: पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्र्यांचा 'पद्मभूषण' स्विकारण्यास नकार
तालुकानिहाय कोरोना बाधितांची आकडेवारी नगर शहर :
८०६, पारनेर : १६६, श्रीरामपूर : १५०, पाथर्डी : १३४, नगर ग्रामीण : १२१, शेवगाव : ९९, नेवासे : ८५, भिंगार : ८२, राहाता : ६९, इतर जिल्हा : ६५, राहुरी : ५७, संगमनेर : ४३, श्रीगोंदे ः ४०, कर्जत : ३१, कोपरगाव ः २७, जामखेड : २६, अकोले : २४, मिल्ट्रिहॉस्पिटल : १८ व इतर राज्य : दोन.
जिल्हा परिषद प्रशासनाच्या मागे लागलेले कोरोनाचे ग्रहण काही कमी होईना. आजअखेर जिल्हा परिषदेमध्ये एकूण २३१ जण बाधित झालेले आहेत. जिल्हा परिषदेच्या मुख्यालयात ४१ तर चौदा ग्रामपंचायतींमध्ये १९० जण असे एकूण २३१ जण बाधित आढळले आहेत.
नगर शहरात सर्वाधिक रुग्ण
जिल्ह्यात नगर शहरात सर्वाधिक रुग्ण आढळून आलेले आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून नगर शहरातील कोरोना बाधितांची संख्या वाढत चालली आहे. आज दिवसभरात तब्बल ८०६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आलेले आहे. त्यामुळे शहरात भीती व्यक्त केली जात आहे.
Web Title: Record Increase In Corona Patient
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..