रोहित पवारांच्या मतदारसंघात आरक्षण तिढा, सरपंचपदाचा उमेदवारच नाही

नीलेश दिवटे
Thursday, 28 January 2021

ज्यासाठी गावकऱ्यांनी एवढा अट्टहास केला, ते पद रिक्त राहणार असल्याने, या दोन्ही गावांतील पॅनल प्रमुखांनी खंत व्यक्त केली. 

कर्जत : तालुक्‍यातील चिलवडी व पिंपळवाडी या दोन्ही ग्रामपंचायतींची सरपंचपदे अनुसूचित जाती महिला राखीव निघाली आहेत; मात्र तेथे या आरक्षणाचा प्रभाग आरक्षित नव्हता. त्यामुळे सरपंचपदासाठी कोणीही उपलब्ध नाही. यामुळे येथील सरपंचपद रिक्त राहणार आहे.

ज्यासाठी गावकऱ्यांनी एवढा अट्टहास केला, ते पद रिक्त राहणार असल्याने, या दोन्ही गावांतील पॅनल प्रमुखांनी खंत व्यक्त केली. 
तालुक्‍यातील 91 ग्रामपंचायतींचे आगामी पाच वर्षांसाठीचे सरपंचपदाचे आरक्षण येथे सोडतीने काढण्यात आले. प्रांताधिकारी अर्चना नष्टे व तहसीलदार नानासाहेब आगळे यांनी आरक्षण जाहीर केले. 

हेही वाचा - खासदार विखे पाटील घेणार शरद पवारांची भेट

तालुक्‍यातील 56 ग्रामपंचायतींच्या निवडणुका पार पडल्या; मात्र निवडणुकांनंतर सरपंचपदाचे आरक्षण काढण्यात आले. यामुळे आपल्या ग्रामपंचायतीचे सरपंचपदाचे आरक्षण काय निघते, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आरक्षण सोडतीसाठी त्यामुळे मोठी गर्दी झाली होती. 

सरपंचपदासाठी प्रवर्गनिहाय निघालेले आरक्षण आणि ग्रामपंचायती अशा ः 
अनुसूचित जाती व्यक्ती राखीव ग्रामपंचायती अशा - सिद्धटेक, पाटेवाडी, जलालपूर, रेहेकुरी, आखोणी, चापडगाव. 
अनुसूचित जमाती व्यक्ती राखीव - टाकळी खंडेश्वरी. 
अनुसूचित जाती स्त्री राखीव - तिखी, शिंपोरे, पिंपळवाडी, चिलवडी, बिटकेवाडी. 

नागरिकांचा मागास प्रवर्ग राखीव - खांडवी, रातंजन, चिंचोली रमजान, वायसेवाडी, राक्षसवाडी बुद्रूक, निमगाव डाकू, बेनवडी, कोकणगाव, चिंचोली काळदात, माळंगी, वालवड, चांदे बुद्रुक, दूरगाव. 

नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला राखीव - बजरंगवाडी, पाटेगाव, नागापूर, आंबीजळगाव, जळगाव, बारडगाव दगडी, नागलवाडी, बारडगाव सुद्रिक, अळसुंदे, नांदगाव, निंबे, देशमुखवाडी. जनरल व्यक्ती राखीव - कौडाणे, लोणी मसदपूर, राशीन, गुरवपिंप्री, बाभूळगाव खालसा, कोपर्डी, थेरगाव, रुईगव्हाण, बेलगाव, धालवडी, रवळगाव, निंबोडी, खेड, माही, सीतपूर, दिघी, निमगाव गांगर्डे, मलठण, घुमरी, खंडाळा, काळेवाडी, गणेशवाडी, तोरकडवाडी, परीटवाडी, तरडगाव, कापरेवाडी, नागमठाण. 

जनरल महिला राखीव - डिकसळ, थेरवडी, कुळधरण, कोंभळी, वडगाव तनपुरे, चांदे खुर्द, शिंदे, भांबोरे, खातगाव, मिरजगाव, भोसे, मांदळी, मुळेवाडी, तळवडी, कोरेगाव, सुपे, राक्षसवाडी खुर्द, कानगुडवाडी, करपडी, दुधोडी, कुंभेफळ, बहिरोबावाडी, औटेवाडी, जळकेवाडी, नवसरवाडी, सोनाळवाडी, करमनवाडी. 

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Reservation will go but there is no candidate for Sarpanch post