लाॅकडाऊनच्या तिसऱया टप्प्यात ही बंधने सैल ! 

Restrictions loose in third phase of lockdown
Restrictions loose in third phase of lockdown

नगर ः लॉकडाऊनचा तिसरा टप्प्यात जीवनाश्‍यक वस्तुंच्या विक्रीची दुकाने सुरू करण्याचा प्रशासनाने निर्णय घेतला. कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा भाग म्हणून सार्वजनिक सभा, समारंभ, मिरवणूक, मेळावे यांना तुर्तास बंदीच आहे. ग्रामीण भागात जीवनाश्‍यक वस्तुंच्या दुकानांना मुभा देण्यात आली. महापालिका, नगरपालिका हद्दीत मात्र मर्यादा निश्‍चित करून परवानगी देण्यात आली आहे. सवलत मिळाली असली, तरी सोशल डिस्टन्सिंगचे पालन बंधनकारक करण्यात आले आहे. अनावश्‍यक गर्दी दिसल्यास दुकान मालकांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. 

जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी प्राप्त असलेल्या अधिकाराचा वापर करीत काल (रविवारी) मध्यरात्री आदेश जारी केले. लॉकडाऊनच्या काळात सार्वजनिक ठिकाणी पाचपेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास तसेच प्रवासी वाहतुकीला मनाई करण्यात आली आहे. आदेशात कृषी विषयक कामांना मुभा देण्यात आली आहे. तूर, कापूस, हरभरा खरेदी केंद्रे, कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये केवळ व्यापारी, शेतकरी यांना मुभा राहील. 

महापालिका, नगरपालिका हद्दीत एकल निवासी संकुलातील व वसाहती लगतची दुकाने सुरू राहतील. मात्र, अशा भागात एखाद्या गल्लीत रस्त्यावर पाच पेक्षा जास्त दुकाने असल्यास जीवनाश्‍यक वस्तूंचीच दुकाने सुरू राहणार आहे, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. सदरचा आदेश हॉटस्पॉटच्या ठिकाणी लागू नाही. हॉटस्पॉटमध्ये संचारबंदी लागू राहणार नाही. 

काय असणार सुरू 
संरक्षण, सुरक्षा सेवा, आरोग्य व कुटुंब कल्याण, पोलिस, कारागृह होमगार्डस, अग्निशमन व आपत्कालीन सेवा, आपत्ती व्यवस्थापन व संलग्न सेवा, एनआयसी, एनसीसी, इलेक्‍ट्रॉनिक माध्यमे (ब्रॉडकास्टिंग, डीटीएच, केबल सेवा), ग्रामपंचायत स्तरावरील सीएसपी सेंटर्स, वीजनिर्मिती, इलेक्‍ट्रॉनिक ट्रान्सफॉर्मरची दुरुस्ती करणारी वर्कशॉप, ग्रामीण भागात मॉल्स वगळता सर्व दुकाने, गो-शाळा, पोल्ट्री फार्म, वन विभागाची कामे, रोजगार हमी योजना, पेट्रोल-डिझेल विक्री, इंटरनेट सेवा, पाणीपुरवठा, स्वच्छतेची कामे, टंचाईनिवारणाची कामे, दवाखाने, पॅथॉलॉजी लॅबोरेटरी, किराणा दुकान, पिठाची गिरणी, फळे- भाजीपाला, गॅस वितरण सेवा, वर्तमानपत्रे, चिकन-अंडी दुकाने, पशुखाद्य दुकाने, पशुवैद्यकीय दवाखाने, रेल्वेद्वारे वस्तू, माल, पार्सलची ने-आण, वाहतूक करणाऱ्या वाहनांची दुरुस्ती, रस्तेबांधणी, सिंचन प्रकल्प, नागरी भागातील उद्योग, आयटी हार्डवेअरचे उत्पादन उद्योग, पॅकेजिंग सामग्रीचे उत्पादन उद्योग. 

हे मात्र बंदच 
सभा, समारंभ, सांस्कृतिक, धार्मिक व सामाजिक कार्यक्रम, सण-उत्सव, उरूस, यात्रा-जत्रा, मनोरंजन कार्यक्रम, क्रीडा स्पर्धा, कार्यशाळा, कॅम्प, प्रशिक्षण वर्ग बैठक, मिरवणूक, मेळावे, आंदोलने, मोर्चा, देश-विदेश सहली दुकाने, उपाहारगृहे, खाद्यगृहे, खानावळी, शॉपिंग कॉम्प्लेक्‍स, मॉल्स, सुपर मार्केट, भाजीपाला बाजार, मनोरंजनाची ठिकाणे, क्‍लब, पब, क्रीडांगणे, क्रीडासंकुले, मैदाने, जलतरण तलाव, उद्याने, सिनेमागृहे, सभागृह, नाट्यगृहे, शाळा-महाविद्यालये, शिकवणीवर्ग, व्यायामशाळा, संग्रहालये, महा-ई-सेवा केंद्रे, आधार केंद्रे, दुय्यम निबंधक कार्यालय, धार्मिक स्थळे. 65 वर्षांवरील व्यक्ती, गरोदर महिला व 10 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना अत्यावश्‍यक सेवा व वैद्यकीय कारणांशिवाय सार्वजनिक ठिकाणी येण्यास मनाई राहील. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com