
कान्हुर पठार (ता. पारनेर) हे पठार भागावरील वाटाणा पिकाचे मुख्य आगार!
टाकळी ढोकेश्वर (अहमदनगर) : कान्हुर पठार (ता. पारनेर) हे पठार भागावरील वाटाणा पिकाचे मुख्य आगार! मुंबई व पुणेसह इतर शहरांना या वाटाणाची विशेष आवड आहे. इंदुरीकर महाराज देशमुख यांनाही हा मोह आवरला नाही.
कुटुंबासमवेत जेजुरी येथे देवदर्शनासाठी गेलेले इंदुरीकर महाराज परतीच्या प्रवासात कान्हुर पठार येथे आले. तेव्हा शेतकरी वाटाणा विक्रीसाठी व्यापाऱ्यांकडे देत होते. हे महाराजांनी पाहीले व लोगलाग चालकास गाडी थांबविण्यासाठी सांगितली. व्यापारी कानिफनाथ लोंढे यांच्या वजन काट्यावर सुरू आसलेली वाटाणाची विक्री पाहीली व कसा दिला वाटाणा आसे विचाराले. व्यापारी लोंढे हे ही महाराजांना थेट समोर पाहिल्यानंतर काय बोलावे ते सुचेना. किलोचा भाव सांगितल्यावर महाराजांनी पाच किलो वाटाणा देण्याची मागणी केली.
खरेदी झाल्यानंतर व्यापा-यांनी तुमच्याकडुन पैसे नको आसे महाराजांना सांगितले. मात्र हे शेतक-याचे घामाचे पैसे आहेत. तुम्हाला पैसे घ्यावेच लागतील आसे ठणकावून सांगितल्यावर व्यापा-यानी ते स्विकाराले. त्यानंतर महाराजांना पाहिल्यानंतर उपसरपंच सागर व्यवहारे, लहु बुचुडे, विशाल व्यवहारे, स्वप्नील खोडदे, संजय सोनावळे, असिफ शेख, राजू इनामदार यांच्यासह इतर ग्रामस्थांनी महाराजांना आदरातिथ्य घेण्याची विनंती केली. त्यांनी ही शेती, पाऊस, पाणीची चौकशी करत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी नको, असा सल्ला देत आपल्या परतीच्या प्रवासाकडे रवाना झाले.
संपादन : अशोक मुरुमकर