गावावरून येणाऱ्यांना पुन्हा 'क्वारंटाईन' करा

तालुक्यातील रूग्णाच्या संख्येत वाढ होऊ नये, याची खबरदारी सरकारी अधिकारी तसेच पदाधिकाऱ्यांची सुद्धा आहे.
Revenue Minister Balasaheb Thorat
Revenue Minister Balasaheb Thorat Esakal

पारनेर (अहमदनगर) : मुख्यमंत्र्यांनी यावेळी लोकडाऊनमध्ये जनतेची गैरसोय होऊ नये तसेच जनहित डोळ्यासमोर ठेऊन काही बाबतीत सवलत दिली आहे. याचा गैरफायदा घेऊ नका. मात्र स्वत:ची व कुटुंबाची काळजी घ्या! पारनेर तालुक्यात मोठ्या प्रमाणात मुंबई पुण्याचे पाहुणे व व कुटुंबीय गावी येतात, त्यांना पुन्हा 'क्वारंटाईन 'करा, असे प्रतिपादन महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.

तालुक्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी महसूलमंत्री थोरात यांच्या उपस्थितीत शनिवारी (ता.17) येथील गणेश मंगल कार्यालयात बैठक आयोजीत केली होती. त्यावेळी थोरात बोलत होते. यावेळी आमदार निलेश लंके, आमदार डॉ.सुधीर तांबे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रताप शेळके, कृषी व बांधकामचे सभापती काशिनाथ दाते, पारनेरचे सभापती गणेश शेळके, प्रांताधिकारी सुधाकर भोसले, तहसीलदार ज्योती देवरे, गटविकासअधिकारी किशोर माने, मुख्याधिकारी डॉ.सुनिता कुमावत, पोलीस निरीक्षक घनश्याम बळप, नितुनकुमार गोकावे, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष संभाजी रोहकले आदी यावेळी उपस्थित होते.

थोरात यांनी पारनेरकरांच्या शिस्तबद्ध लॉकडाऊनचे कौतुक करत यासाठी काम करणा-या तहसीलदार देवरे व पोलिस निरीक्षक भळप व गोकावे यांचे कौतुक केले. पारनेरकरांचा व मुंबईचा जवळचा संबंध आहे. कोरोनाच्या दुस-या लाटेला सुरूवात झाल्याने मुंबई व पुण्यातील पारनेरकर पुन्हा गावी परतत आहेत. यामुळे तालुक्यात कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता असल्याने मुंबईच्या पाहुण्यांना गावी आल्यानंतर 10 दिवस गावातच क्वारंटाईन करावे, असे थोरात यांनी सांगितले.

मागील कोरोना लाटेच्या वेळी आपण अशा पाहुण्यांना क्वारंटाईन करत होतो याची आठवण करून दिली. तालुक्यातील रूग्णाच्या संख्येत वाढ होऊ नये, याची खबरदारी सरकारी अधिकारी तसेच पदाधिकाऱ्यांची सुद्धा आहे. सध्याचा आजार जीवघेणा आहे, या साथीच्या काळात राजकारानाच्या पलिकडे जाऊन काम करावे. प्रत्येकांनी सर्तकतेने राहावे, ऑक्सिजन तसेच रेमडिसिव्हिर कमी पडत आहे, लवकरच सुरळीत होईल आपण सर्वांनी शिस्त पाळली व दक्षता घेतली तर येत्या 15 दिवसात कोरोना आजार आटोक्यात येईल, असेही शेवटी थोरात म्हणाले.

या वेळी लंके यांनी रूग्णांना बेड, इंजेक्शन मिळत नाहीत तसेच ऑक्सीजनचाही तुटवडा आहे. या बाबत लक्ष घालावे. आम्ही भाळवणी येथे शंभर ऑक्सिजन बेडचे कोरोना सेंटर सुरू केले. मात्र ऑक्सिजन मिळत नाही असे सांगत या बाबत आपण स्वत: लक्ष घालावे अशी मागणी केली. तहसीलदार देवरे यांनी एलसीडी द्वारे तालुक्यात कोरोना बाबात करत असलेल्या उपाययोजनांचे सादरीकरण केले.

आमदार निलेश लंके यांनी भाळवणी येथे एक हजार शंभर बेडचे कोरोना सेंटर सुरू केले आहे. ते कोरोना रूग्णांसाठी खूप मोठी सेवा देत आहेत. त्यांनीही मास्क वापरावा व स्वत:ची काळजी घ्यावी कारण ते आजरी पडलेले आम्हाला व तालुक्यातील जनतेला परवडणार नाही.

- बाळासाहेब थोरात, महसुलमंत्री

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com