मिरजगावात वकिलाच्या घरावर दरोडा... इतका ऐवज लंपास

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 24 June 2020

तालुक्‍यातील मिरजगाव येथील शिंगवी कॉलनीत ऍड. मधुकर कोरडे यांच्या घरात आज पहाटे दोनच्या सुमारास दरोडेखोरांनी धुमाकूळ घातला. तलवारीचा धाक दाखवीत, सोन्याच्या दागिन्यांसह सुमारे तीन लाखांचा ऐवज लुटून नेला.

कर्जत : तालुक्‍यातील मिरजगाव येथील शिंगवी कॉलनीत ऍड. मधुकर कोरडे यांच्या घरात आज पहाटे दोनच्या सुमारास दरोडेखोरांनी धुमाकूळ घातला. तलवारीचा धाक दाखवीत, सोन्याच्या दागिन्यांसह सुमारे तीन लाखांचा ऐवज लुटून नेला.

आवश्‍य वाचा प्राथमिक शिक्षक बॅंकेतील घड्याळ खरेदीच्या चौकशीचे आदेश

पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवीत पाच जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आणि चौकशीअंती त्यांतील सोन्या ईश्वर भोसले (वय 25) व धोंड्या ईश्वर भोसले (वय 27, दोघे रा. बेलगाव, ता. कर्जत) या दोघांना अटक केली. पाच आरोपी पसार आहेत. 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पहाटे दोनच्या सुमारास सात ते आठ जणांच्या टोळीने ऍड. कोरडे यांच्या बंगल्याच्या स्वयंपाकखोलीच्या दरवाजाची आतील कडी- कोयंडा कटावणीने तोडून घरात प्रवेश केला. बेडरूममध्ये झोपलेल्या ऍड. कोरडे दाम्पत्याला तलवारीचा धाक दाखवून कपाटातील नऊ तोळे सोने व चांदीचे काही दागिने मिळून अंदाजे तीन लाखांचा ऐवज लंपास केला. माहिती मिळताच पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले. तपासाची चक्रे फिरवीत पाच जणांना बेलगाव येथून चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यांतील दोघांना अटक करण्यात आली आहे. 

जाणून घ्या डॉ. शंकरप्रसाद गंधे याला बेड्या... गर्भपात केल्याचे कारण 

जिल्हा पोलिस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह, अप्पर पोलिस अधीक्षक सागर पाटील, उपअधीक्षक प्रांजली सोनवणे व संजय सातव यांनी आज सकाळी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. त्यांच्या समवेत असलेल्या श्‍वानपथकाने काही अंतरावर असलेल्या पेट्रोल पंपापर्यंत माग काढला. नंतर बहुधा दरोडेखोर मोटारीतून पळून गेले असावेत. 
मध्यवस्तीत पडलेल्या या धाडसी दरोड्यामुळे मिरजगावसह परिसरात घबराट पसरली आहे. दरम्यान, घटनेनंतर ऍड. कोरडे यांनी मिरजगाव येथील पोलिस दूरक्षेत्राशी तातडीने संपर्क साधला; मात्र प्रतिसाद मिळाला नाही. याबाबत राष्ट्रवादी डॉक्‍टर्स सेलचे डॉ. चंद्रकांत कोरडे यांनी जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे तक्रार केली आहे.  

हेही वाचा अरेरे दु: खत घटना श्रीगोंदे शेततळ्यात बुडून सख्या भावंडांचा मृत्यू 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Robbery at lawyer's house in Mirajgaon