मंदिरे उघडण्यासाठी साधू-संतांचे उपोषण

Sadhu-saints fast to open temples
Sadhu-saints fast to open temples

शिर्डी ः राज्यातील प्रमुख देवस्थाने खुली करण्यासाठी भाजप पुन्हा आक्रमक झाली आहे. येत्या मंगळवारी (ता.13) ठिकठिकाणी साधूसंत लाक्षणिक उपोषण करणार असून, त्यास भाजपचा पाठिंबा, असे आंदोलन करण्याचे ठरवले आहे.

पक्षाच्या अध्यात्मिक आघाडीचे प्रमुख आचार्य अतुल भोसले हे त्र्यंबकेश्वर येथील महंतासोबत येथे उपोषण करतील. त्यांना पाठिंबा देण्यासाठी प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील येणार आहेत. शिर्डी या आंदोलनाचे मुख्य केंद्र असेल, असे पक्षाने आज जाहीर केले. 

मंदिरे उघडण्यासाठी पूर्वी केलेले घंटानाद आंदोलन केवळ पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांपुरते मर्यादित होते. या वेळी साधूसंताना मैदानात उतरवून भाजपने पाठिंबा द्यायचा, अशी रचना केली आहे. आंदोलनाची व्याप्ती वाढविण्यासाठी मंदिरावर अवलंबून असलेले छोट्या-मोठ्या व्यावसायिकांनाही आंदोलनात सहभागी करून घेतले जाणार आहे. 

देशातील प्रमुख देवस्थानात शिर्डीचा समावेश असल्याने येथील आंदोलनावर प्रदेश भाजपने लक्ष केंद्रित केले आहे. याबाबत साईसंस्थानचे माजी विश्वस्त सचिन तांबे म्हणाले, की साईमंदिर बंद असल्याने, शिर्डीसह परिसरातील गावांचे अर्थकारण ठप्प झाले. छोट्या व्यावसायिकांनी स्थलांतर केले. तिरूपती देवस्थानाच्या विश्वस्त मंडळाने खबरदारी घेत मंदिर खुले केले. साईसंस्थानने तयारी केली; मात्र राज्य सरकार परवानगी देत नसल्याने पंचाईत झाली. 

पक्षाचे शहराध्यक्ष सचिन शिंदे म्हणाले, की साईमंदिर बंद असल्याने दुकाने बंद आहेत. त्यामुळे हे व्यावसायिक या आंदोलनात सहभागी होणार आहेत. सरला बेटाचे महंत रामगिरी महाराजांनाही या आंदोलनात सहभागी होण्यासाठी निमंत्रण दिले आहे. 

शिर्डीत सर्वाधिक कोरोनाबाधित 
शिर्डीत आजवर सर्वाधिक 465 रुग्णांना कोविड संसर्ग झाला. 13 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, तर चौघांचा मृत्यू झाला. राज्यभर कोविडचा प्रकोप सुरूच असल्याने राज्य सरकार मंदिरे खुले करण्याबाबत द्विधा मन:स्थितीत आहे. 

संपादन - अशोक निंबाळकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com