संभाजी राजे भोसले म्हणाले, 'शिवरायांचे किल्ले हिच त्यांची जिवंत समाधी'

Sambhaji Raje Bhosale
Sambhaji Raje Bhosale Sakal

अकोले ( अहमदनगर ) : अकोले तालुक्यातील ठाणगाव येथील विश्रामगड विकास मंडळातर्फे विश्राम गडावर 342 वा शिव पदस्पर्श दिन विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. शिव पदस्पर्श दिनानिमित्त शिवाजी महाराजांचे वंशज खासदार संभाजी राजे भोसले, पंचक्रोशीतील सर्व शिवभक्त व आबालवृद्धांनी कार्यक्रमाला हजेरी लावत छ्त्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले.

विश्रामगडावर संभाजी राजे भोसले यांनी गडावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी पावसात जाऊन गडावरील पुतळ्यास वरुणराजाच्या साक्षीने अभिवादन केले. तसेच पुतळ्याला अभिषेक करण्यात आला. संभाजी राजांनी गडाच्या पायथ्याशी असणाऱ्या शिवभक्तांना मुसळधार पावसात मार्गदर्शन करतांना सांगितले की, पोर्ट फांउडेशनतर्फे 20 किल्ले दत्तक घेतले असून त्यात विश्रामगड हा किल्ला दत्तक घेतला आहे. यापुढे किल्ल्याचे संवर्धन करण्यासाठी सर्वोतेपरी सहकार्य करणार आहे. जिवंत किल्ले हिच खरी महाराजांची खरी समाधी आहे, तेव्हा तिची संवर्धनकरणे ही काळाजी गरज आहे, गडाची डागडुगी करतांना नवीन पध्दतीने न करता जुन्या पध्दतीने करण्यात येईल त्यासाठी पोर्ट फाउंडेशन कटिबध्द असल्याचे सांगितले. या प्रसंगी 'शिवाजी महाराज की जय', 'जय भवानी' 'जय शिवाजी', 'जय जिजाऊ' जय शिवराय' छत्रपती संभाजी महाराज की जय, 'हर हर महादेव' आदी घोषणांनी गड दुमदुमला

Sambhaji Raje Bhosale
अवघ्या 1 रुपयात 101 शाही विवाह! पवार कुटुंबीय करणार कन्यादान

22 नोव्हेंबर 1679 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांनी जालण्याची लूट करून बहिर्जी नाईक या मावळयाने महाराजांना विश्रामगड (पट्टा किल्ला) येथे सुखरूप आणले होते. महाराजांनी या गडावर 15 दिवस मुक्काम केला होता, यामुळे ठाणगाव येथील विश्रामगड विकास मंडळ व जनसेवा सेवाभावी संस्था यांच्या वतीने दरवर्षी 22 नोव्हेंबर हा शिव पदस्पर्श दिन म्हणून साजरा करण्यात येतो. त्या पार्श्वभूमीवर विश्रामगडावर नाशिक, सिन्नर,अकोले, संगमनेर इगतपुरी,अहमदनगर आदी परिसरातील शिवप्रेमींनी उपस्थित राहून छत्रपती शिवाजी महाराजांच्या आठवणींना उजाळा दिला.

संभाजी राजे भोसले यांच्या हस्ते पालखी पूजन करून ठाणगाव मधून पालखीची मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत माजी आदिवासी विकास मंत्री मधुकर पिचड, माजी आमदार राजाभाऊ वाजे, उदय सांगळे, किरण गायकर, तनुजा घोलप, नामदेव शिंदे, रवींद्र पवार, अरुण केदार, बबन काकड, रामदास भोर, योगेश शिंदे आदी सहभागी झाले होते.

Sambhaji Raje Bhosale
गर्भपाताच्या गोळ्या खाणं पडलं महागात; तरुणीचा मृत्यू | Ahmednagar

आमदार लहामटेंची अनुपस्थिती

या प्रसंगी महाराष्ट्र राज्य आदिवासी संघटनेचे उपाध्यक्ष लकी जाधव यांनी विद्यमान आमदार डॉ. किरण लाहामटे हे छत्रपती संभाजी राजे यांच्या स्वागतासाठी उपस्थित न राहिल्यामुळे संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. तसेच भाजप अनुसूचित जनजाती मोर्चा अहमदनगर जिल्हा सरचिटणीस यांनी देखील आमदार लहामटे हे निवडणुकीच्या वेळेस शिवनेरी गडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजाचे दर्शन घेतले होते पण शिवरायांचे वंशज तालुक्यात आले असता त्यांच्या स्वागताला उपस्थित राहत नाही. ही अत्यंत खेदजनक बाब आहे, असे वक्तव्य करत निषेध नोंदवला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com