esakal | पुलाखालीच वाळू चोरी; टेम्पो पकडला पण चोर पसार
sakal

बोलून बातमी शोधा

Sand theft under Mula river bridge on Nagar Manmad road in Rahuri taluka

राहुरी येथे नगर- मनमाड महामार्गावरील मुळा नदीच्या पुलाखाली वाळू चोरी रोखण्यासाठी तहसीलदार फसियोद्दीन शेख यांनी कंबर कसली आहे.

पुलाखालीच वाळू चोरी; टेम्पो पकडला पण चोर पसार

sakal_logo
By
विलास कुलकर्णी

राहुरी (अहमदनगर) : राहुरी येथे नगर- मनमाड महामार्गावरील मुळा नदीच्या पुलाखाली वाळू चोरी रोखण्यासाठी तहसीलदार फसियोद्दीन शेख यांनी कंबर कसली आहे. महसूलच्या पथकाने पुलाखाली वाळू उपसा करुन, चोरटी वाहतूक करणारा एक टेम्पो रंगेहाथ पकडला. वाळूचोर पसार झाले. राहुरीचे मंडळाधिकारी यांनी दोन वाळू माफियांविरुद्ध गुन्हा नोंदवून, पकडलेला टेम्पो पोलिसांच्या ताब्यात दिला. राहुरी पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत.

टेम्पो मालक जॅकी संजय माळी व टेंपो चालक विजय लखन तामचीकर (दोघेही रा. आदिवासी वसाहत, राहुरी बु.) अशी आरोपींची नावे आहेत. अवैध वाळू वाहतुकीचा टेम्पो (एमएच 12 यूए 7409) पोलिसांच्या ताब्यात दिला आहे. 

नगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
जागतिक बँक प्रकल्पाच्या सार्वजनिक बांधकाम विभाग, नगरचे कार्यकारी अभियंता नरेंद्र राजगुरु यांनी पुलाची पाहणी करून, पुलाखाली वाळू चोरी रोखण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या मार्फत राहुरीचे तहसीलदार फसियोद्दीन शेख यांना कळविले. त्यानंतर महसूल खात्याचे पथक प्रमुख मंडलाधिकारी चांद देशमुख (ब्राह्मणी), तलाठी अंकुश सोनार (उंबरे), रवींद्र बाचकर (वळण), राहुल कराड (केंदळ बु.) यांच्या पथकाने रविवारी (ता. 9) रात्री 10 वाजता मुळा नदी पात्रात पुलाखाली अचानक छापा टाकला. त्यांनी चोरटी वाळू वाहतूक करणारा टेम्पो रंगेहाथ पकडला. निळ्या रंगाचा एक ट्रॅक्टर नदीपात्रातून पळण्यात यशस्वी झाला.

तहसीलदार शेख यांनी सोमवारी (ता. 10) घटनास्थळी पाहणी केली. पुलाखाली पायाजवळ वाळू चोरीमुळे पडलेले मोठे खड्डे आढळले. पुलाखाली तीस ब्रास वाळू साठा आढळला. जेसीबीच्या सहाय्याने वाळू साठा पुलाच्या पायाखाली पसरविण्यात आला. वाळू चोरीची वाहने नदीपात्रात जाऊ नयेत. यासाठी नाव घाटाजवळ व नदीपात्रात जेसीबीने खड्डे खोदले.

तहसीलदार यांच्या आदेशाने राहुरीचे मंडलाधिकारी शंकर सुरेश जगताप (वय 39) यांनी बुधवारी (ता. 12) राहुरी पोलीस ठाण्यात दोन जणांविरुद्ध गुन्हा नोंदवून, पकडलेला टेम्पो पोलिसांच्या ताब्यात दिला. परंतु, राहुरी पोलिसांनी पसार वाळू चोरांना पकडण्यासाठी मागील दहा दिवसात कोणत्याही हालचाली केल्या नाहीत.
अवैध वाळू उपशामुळे पुलाचा पाया उघडा पडल्याने, पुल धोकादायक बनत चालला आहे. 

संपादन : अशोक मुरुमकर