संगमनेरने ओलांडला दहा हजार कोरोनाबाधितांचा आकडा

Sangamner crosses the number of ten thousand corona victims
Sangamner crosses the number of ten thousand corona victims

संगमनेर ः संगमनेर तालुक्‍यात दहा हजार कोरोना बाधित झाले आहेत. मागील वर्षापासून आजपर्यंत तालुक्‍यात सध्या बाधीत रुग्णांची संख्या एक हजार 268 झाल्याने सगळ्यांची चिंता वाढली आहे. रविवारी दिवसभरात तालुक्‍यातील 171 रुग्णांना घरी सोडण्यात आले. 

संगमनेर तालुक्‍यातील घुलेवाडीच्या ग्रामीण रुग्णालयात राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या पाठपुराव्यातून व पॅथ ऑर्गनाझेशन, मुंबईचे राज्य प्रकल्प समन्वयक ज्ञानेश्वर वामन यांच्या सहकार्यामुळे, आरटीपीसीआर चाचण्या स्थानिक पातळीवर करणाऱ्या यंत्रणेची व्यवस्था झाली आहे. यामुळे संगमनेर व अकोले तालुक्‍यातील गंभीर अथवा तत्काळ उपचारांची गरज असलेल्या रुग्णांसाठी फायदा होणार आहे. मात्र चाचण्यांचा वेग वाढल्याने संक्रमित रुग्ण समोर येण्याची गती वाढली आहे.

या वाढत्या सक्रीय रुग्णसंख्येमुळे आरोग्य यंत्रणांवरील ताण वाढला आहे. आज तालुक्‍यात केवळ 70 रुग्ण समोर आल्याने थोडा दिलासा मिळाला. जिल्ह्यातील रुग्णवाढीच्या तिसऱ्या स्थानावर असलेल्या संगमनेरची जागा आता श्रीरामपूर तालुक्‍याने घेतली आहे. गेल्या अकरा दिवसांत तालुक्‍यात एक हजार 389 रुग्ण आढळले आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com