esakal | संगमनेर: घुलेवाडीचे लोकनियुक्त सरपंच सोपान राऊत यांचे पद रद्द
sakal

बोलून बातमी शोधा

संगमनेर: घुलेवाडीचे लोकनियुक्त सरपंच सोपान राऊत यांचे पद रद्द

संगमनेर: घुलेवाडीचे लोकनियुक्त सरपंच सोपान राऊत यांचे पद रद्द

sakal_logo
By
आनंद गायकवाड

संगमनेर (जि. अहमदनगर) : तालुक्यातील राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या समजल्या जाणार्‍या घुलेवाडीचे लोकनियुक्त सरपंच सोपान राऊत यांच्या विरोधात ग्रामपंचायत सदस्यांनी दाखल केलेल्या अविश्वास ठरावानंतर 5 जुलैला विशेष सभा बोलावण्यात आली होती. त्यात उपस्थित 17 सदस्यांसह सरपंचांचे मतदान घेतल्यानंतर ठरावाच्या बाजूने 16 मते पडल्याने अविश्वास ठराव मंजूर करण्यात आला होता.

हेही वाचा: नगर : सर्वपक्षीय कार्यकर्ते चक्क खड्ड्यात बसून गोट्या खेळले!

याबाबतचा सविस्तर अहवाल जिल्हाधिकार्‍यांना पाठविण्यात आल्यानंतर आज घुलेवाडीतील महात्मा फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात विशेष ग्रामसभेत घेण्यात आलेल्या मतदानात सरपंच राऊत यांच्या विरोधात 1 हजार 184 मते पडल्याने अविश्‍वास ठराव मंजूर झाला आहे.

अनेक दिवसांपासून या बाबतच्या खदखदीतून लोकनियुक्त सरपंच सोपान राऊत यांच्याविरोधात अविश्वास ठराव आणण्यात आला. 5 जुलै रोजी तहसीलदार अमोल निकम यांच्या अध्यक्षतेखाली बोलावलेल्या विशेष सभेत यावर सर्व सदस्यांची मते जाणून घेण्यात आली. या वेळी झालेल्या मतदानात ठरावाच्या बाजूने 16 मते पडल्याने, अविश्वास ठराव मंजूर करण्यात आला होता.

मात्र, सरपंच राऊत हे थेट जनतेतून निवडून आल्याने या बाबतचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना पाठवण्यात आला होता. त्यांच्या आदेशानुसार आज ( ता. 13 ) विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यानुसार घुलेवाडीच्या महात्मा फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात सकाळी 9 वाजल्यापासून ही प्रक्रिया सुरु करण्यात आली.

ग्रामसभेत ठरावाच्या बाजूने व विरोधात असे दोन्ही मतप्रवाह असल्याने तहसीलदार अमोल निकम यांनी मतदान प्रक्रीया राबविली. त्यात अविश्‍वास ठरावाच्या बाजूने 1 हजार 184 तर ठरावाच्या विरोधात 1 हजार 15 मते पडली. त्यामुळे लोकनियुक्त सरपंच सोपान राऊत यांच्यावरील अविश्‍वास ठराव 169 मतांनी मंजूर झाल्याने त्यांचे सरपंचपद संपुष्टात आले आहे.

तालुक्यातील सर्वाधिक लोकसंख्या आणि महसूल असलेली ग्रामपंचायत अशी ओळख असलेल्या घुलेवाडीवर महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे वर्चस्व आहे. थोरात साखर कारखाना, तालूका दूध संघ, कामगार वसाहत, विविध शैक्षणिक संस्था व अमृत उद्योग समूहाचे बहुतेच प्रकल्प आहेत. मोठ्या प्रमाणात नागरी वसाहत असल्याने, राजकिय दृष्टीकोनातून या गावाला मोठे महत्व आहे. मात्र या गावातील लोकनियुक्त सरपंचावर अविश्वास ठराव मंजूर झाल्याने, राजकारण ढवळले आहे.

loading image
go to top