कोरोनाचा प्रादुर्भाव तुम्हीच रोखा; गावकारभाऱ्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना साकडे

Jamkhed
JamkhedSYSTEM

जामखेड (जि. नगर) : तरुणाईचा मुक्त संचार, मास्क न लावता फिरणे, लग्नसोहळे, जत्रा, जागरण-गोंधळ, दूध डेअरी, लिंबू आडत व विविध धार्मिक कार्यक्रमांमुळे कोरोना वाढत असल्याची बाब विविध गावांतील गावकारभाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली अन् हे सर्व रोखण्याचे साकडे घातले. त्यावर, नियमांची पायमल्ली करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारीमहोदयांनी तालुका प्रशासनाला दिले.

जामखेड तालुक्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे यांनी जामखेड तालुक्याचा दौरा केला अन् फक्राबाद येथे आढावा बैठक घेऊन गावोगावच्या सरपंचांकडून कोरोनाची स्थिती जाणून घेतली. यावेळी कोरोना संसर्ग वाढण्यासाठी कारणीभूत ठरत असलेल्या विविध कारणांचा पाढाच सरपंचांनी जिल्हाधिकारी महोदयांसमोर मांडला. सरपंचांनी सांगितलेल्या सर्व कारणांची दखल जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली आणि कडक कार्यवाहीचे फरमान सोडले. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठीचा चेंडू जिल्हाधिकारी महोदयांनी तालुका प्रशासनाच्या कोर्टात टोलवला आहे. त्यामुळे तालुका प्रशासन कोरोनाचा उद्रेक रोखण्यासाठी काय कठोर उपाययोजना राबवणार, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

Jamkhed
ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत खंडणीची मागणी; तिघांविरोधात गुन्हा

जिल्हाधिकारी भोसलेंचे फर्मान

चाचणी न करता कोरोनाबाधितांवर जी खासगी रुग्णालये उपचार करीत आहेत, त्यांच्यावर कारवाई करावी. ज्या गावांमध्ये बाधितांची संख्या वाढली आहे, ती गावे तातडीने बंद करा. स्थानिक प्रशासनास जे कुणी अडथळा आणत असतील, त्यांच्यावर कठोर कारवाई करावी. ज्या गावांतील व्यापारी, दुकानदार व इतर आस्थापना कोरोना नियमांचे पालन करण्यात सहकार्य करीत नाहीत, त्या तातडीने ‘सील’ करा, असे आदेश जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी तालुका प्रशासनाला दिले.

यावेळी झालेल्या बैठकीस प्रांताधिकारी अर्चना नष्टे, तहसीलदार विशाल नाईकवाडे, पोलिस निरीक्षक संभाजीराव गायकवाड, गटविकास अधिकारी परशुराम कोकणी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुनील बोराडे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय वाघ, मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते, डॉ. सदाफुले, सरपंच विश्वनाथ राऊत, पोलिस पाटील, योगेश जायभाय, विविध गावांचे सरपंच, ग्रामसेवक व तलाठी यावेळी उपस्थित होते.

Jamkhed
नगरमुळे उत्तर महाराष्ट्रात वाढली कोरोनाची चिंता! खानदेश मात्र शून्याकडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com