Satyajeet Tambe : आमदारकीचा परिणाम काही सांगता येत नाही; सत्यजित तांबे

सत्यजित तांबे ; कविता आवडली म्हणून ट्वीट केली, वेगळा अर्थ काढू नका
Satyajeet Tambe News
Satyajeet Tambe Newsesakal

Satyajeet Tambe News : विरोधकांना त्रास द्यायचा नाही, या संगमनेरच्या संस्कृतीचा मी पाईक आहे. राजकीय विधाने करण्याऐवजी कामावर भर देईन अन्‌ अपक्ष आमदार म्हणूनच कार्यरत राहीन.

मतदारसंघातले प्रश्न सोडवायचे आणि लोकांची कामे करायची तर सत्ताधाऱ्यांचे सहकार्य गरजेचे असते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत फार पूर्वीपासूनचे स्नेहसंबंध आहेत.

मी आमदार झालो त्याचे अहमदनगर जिल्ह्याच्या राजकारणावर काय परिणाम होतील, हे लगेचच सांगता येणार नाही, अशा शब्दांत आमदार सत्यजित तांबे यांनी ‘सकाळ’ला दिलेल्या मुलाखतीत आपल्या भावना व्यक्त केल्या. आज राहाता तालुक्यातील मतदारांचे आभार मानण्यासाठी ते येथे आले होते. राहाता ते अस्तगाव या प्रवासात त्यांनी ही मुलाखत दिली. यावेळी त्यांच्याशी झालेली प्रश्नोत्तरे ...

प्रश्न - ‘उडत्या पाखरांना परतीची तमा नसावी, नजरेत सदा नवी दिशा असावी..... घरट्याचे काय, बांधता येईल केव्हाही, क्षितिजापलीकडे झेप घेण्याची जिद्द असावी'' या आपण काल केलेल्या ट्वीटचा सरळ अर्थ काय?

तांबे - काल एका शाळेच्या स्नेहसंमेलनात ही कविता ऐकली आणि आवडली म्हणून ट्वीट केली. त्यातून काही वेगळा अर्थ काढू नये. मी अपक्षच राहीन आणि कामे मार्गी लावण्यासाठी सर्वांचे सहकार्य घेईन.

प्रश्न - विरोधकांना त्रास द्यायचा नाही, ही संगमनेरची पंरपरा आहे असे विधान आपण केले. त्याबाबत विस्ताराने काय सांगाल ?

तांबे - फार पूर्वी एकदा जनसंघाचे नेते म्हणून (कै.) अटलबिहारी वाजपेयी तत्कालीन केंद्रीय कृषिमंत्री (कै.) अण्णासाहेब शिंदे यांच्या विरोधात प्रचार करण्यासाठी अहमदनगर जिल्ह्यात आले. त्यांनी जोरदार प्रचारसभादेखील घेतल्या.

गमतीचा भाग असा, की या दौऱ्यात ते एकदा (कै.) शिंदे यांच्या घरी भोजनासाठीदेखील गेले. विरोध कायम ठेवून स्नेहभोजन. याला म्हणतात राजकारण. मला असे राजकारण अभिप्रेत आहे, म्हणून मी हे विधान केले.

प्रश्न - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आपल्या काय अपेक्षा आहेत ?

तांबे - त्यांचे आणि माझे स्नेहसंबंध हे या निवडणुकीपुरते नव्हते. माजी आमदार (कै.) राजीव राजळे यांच्या कार्यकालापासून हे संबंध मी जपले आहेत.

मतदारसंघातील प्रश्न सोडविण्यासाठी त्यांचे सहकार्य घेईन. प्रश्न पूर्वीचेच असले, तरी ते आपण कसे मांडतो आणि सोडवून घेतो, याबाबतचे कौशल्य महत्त्वाचे असते. अर्थात, त्यासाठी सत्ताधाऱ्यांचे सहकार्यदेखील गरजेचे असते.

प्रश्‍न - नाशिक पदवीधर मतदारसंघाची निवडणूक माध्यमांतून फार गाजली आणि आपण तिच्या केंद्रस्थानी होता. याबाबत काय सांगाल?

तांबे - मी या निवडणुकीत घडलेल्या राजकारणाबाबत बोलणार नाही. माझे वडील डॉ. सुधीर तांबे यांनी बांधलेला हा मतदारसंघ ५४ तालुक्यांचा आणि साडेपाचशे किलोमीटर क्षेत्रफळाचा आहे.

माझे सहकारी असलेले सुमारे सातशे ते आठशे युवक प्रचारात सक्रिय होते. एका बाजूला राजकारण सुरू होते अन्‌ दुस-या बाजूला विविध संघटना, संस्थांची पाठिंबा देण्यासाठी घाई सुरू होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com