साईसंस्थानकडून मिळणाऱ्या निधीत अफरातफर 

Scams in funding from Sai Sansthan
Scams in funding from Sai Sansthan

शिर्डी ः "साईदर्शनासाठी रोज सरासरी चाळीस ते पन्नास हजार भाविक येतात, हे गृहीत धरून साईसंस्थानकडून नगरपंचायतीला शहरस्वच्छतेसाठी दरमहा 42 लाख रुपये दिले जातात. मात्र, गेल्या दोन महिन्यांपासून लॉकडाउन आहे तरीही हा निधी का घेतला जातो? मिळणाऱ्या निधीतून ठेकेदार कंपनी स्वच्छता कर्मचाऱ्यांना तुलनेत कमी पगार देते. भाविक नसताना निधी घेणे व मिळणाऱ्या निधीतील अफरातफरीची चौकशी करावी,' अशी मागणी विरोधी महाविकास आघाडीतील नगरसेवकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. 

या निवेदनाची प्रत त्यांनी आज नगरपंचायतीचे मुख्याधिकारी सतीश दिघे व साईसंस्थानचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे यांना दिली. नगरपंचायत कार्यालयात हे निवेदन देताना महाविकास आघाडीचे कमलाकर कोते, माजी नगराध्यक्ष अनिता जगताप, माजी उपनगराध्यक्ष नीलेश कोते, विजय जगताप, संजय शिंदे, सचिन कोते, प्रकाश गोंदकर आदी उपस्थित होते. सत्ताधारी गटाचे माजी नगराध्यक्ष कैलास कोते, माजी उपनगराध्यक्ष अभय शेळके, नितीन कोते, उपनगराध्यक्ष मंगेश त्रिभुवन, नगरसेवक सुजित गोंदकर, दत्ता कोते व अरविंद कोते आदी उपस्थित होते. 

निवेदनात म्हटले आहे, की साईसंस्थानकडून शहरस्वच्छतेसाठी मिळणाऱ्या निधीतून 157 सफाई कर्मचाऱ्यांना दरमहा चौदा हजार रुपये मिळायला हवेत. प्रत्यक्षात गेल्या अडीच वर्षांपासून दरमहा केवळ नऊ हजार रुपये दिले जातात. उर्वरित रक्कम कुठे जाते? सत्ताधारी व विरोधी गटाच्या नगरसेवकांनी वारंवार याबाबतचा हिशेब मागितला; मात्र तो देण्यास टाळाटाळ केली जाते. या अफरातफरीची चौकशी करावी. वेतनफरकाची रक्कम परत मिळावी. गेल्या दोन महिन्यांपासून लॉकडाउनमुळे भाविक नाहीत. दुकाने बंद आहेत. शहरात कचरा होत नाही, तरीही साईसंस्थानकडून दरमहा 42 लाख रुपये घेण्यात येतात. ही रक्कम साईसंस्थानला परत केली जावी. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com