परीक्षा जवळ आली आणि शाळा भरली, बुधवारी वाजणार घंटा

School will start from Wednesday
School will start from Wednesday

नगर ः कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू झाले असून, त्यापाठोपाठ आता पाचवी ते आठवीपर्यंतचे वर्ग बुधवारपासून (ता. 27) सुरू होणार आहे. पहिल्याच दिवशी 100 टक्के शाळा सुरू करण्यासाठी प्रशासनाने मोर्चेबांधणी केली आहे. 

कोरोनामुळे नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग 23 नोव्हेंबर 2020 पासून सुरू झाले. नववी ते बारावीपर्यंत जिल्ह्यात 1209 शाळा असून, त्यात 2 लाख 84 हजार 354 विद्यार्थीसंख्या आहे. सध्या 1102 शाळा सुरू असून, सुमारे 1 लाख विद्यार्थी शाळेत अध्यापन करीत आहेत. विशेष म्हणजे शाळा सुरू होणार असल्या तरी परीक्षा जवळ आल्या आहेत.

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे पाचवी ते आठवीपर्यंतचे वर्ग 27 जानेवारीपासून भरविण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. त्यानुसार शिक्षण विभागाने नियोजन केले आहे. 

जिल्ह्यात पाचवी ते आठवीपर्यंत 2003 शाळा असून, त्यात 3 लाख 7 हजार 777 विद्यार्थी शिक्षण घेतात. त्यासाठी एकूण 6641 शिक्षक असून, त्यात जिल्हा परिषदेच्या दीड हजार शिक्षकांचा समावेश आहे. 2003 शाळांमध्ये जिल्हा परिषदेच्या 500 शाळांचा समावेश आहे. 

नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करताना प्रशासनाला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. मात्र, पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू करताना, प्रशासनाने नियोजन केले आहे. त्यामुळे पहिल्याच दिवशी 100 टक्के शाळा सुरू होण्याच्या शक्‍यता आहे. दरम्यान, शाळा सुरू करण्याबाबत प्रशासनाने तयारी केली असली, तरी पालकांची भूमिका काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 
 
आकडेवारी 
पाचवी-आठवीपर्यंत शाळा ः 2003 
शिक्षकसंख्या ः 6641 
शिक्षकांची तपासणी ः 2500 
विद्यार्थीसंख्या ः 3 लाख 7 हजार 777 

शाळाखोल्यांचे निर्जंतुकीकरण 
जिल्ह्यात पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू होत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर सर्वच शाळांमध्ये स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. वर्गखोल्यांचे निर्जंतुकीकरण करण्यात आले. तालुका व जिल्हास्तरावरील पथकांनी शाळांना भेटी देऊन पाहणी केली.

पाचवी-आठवीचे वर्ग 27 जानेवारीपासून सुरू होत असून, त्याचे काटेकोर नियोजन केले आहे. पहिल्या दिवसापासून 100 टक्के शाळा सुरू करण्याचा प्रयत्न आहे. 
- शिवाजी शिंदे, प्रभारी शिक्षणाधिकारी, प्राथमिक शिक्षण विभाग 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com