Waiting for "normal" feedback
Waiting for "normal" feedback

खुलाशासह विभागप्रमुखाच्या  अभिप्रायाची "सामान्य'ला प्रतीक्षा 

नगर : खासगी व्यक्तीची नियुक्ती करून त्याच्याकडून कामकाज करून घेतल्याप्रकरणी सामान्य प्रशासन विभागाने तीन जणांना नोटीस बजावून खुलासा मागविला आहे. या खुलाशावर विभागप्रमुखांचा अभिप्राय असणे आवश्‍यक असल्याचे त्या नोटिशीमध्ये नमूद केलेले आहे.

त्या तिघांचे अहवाल संबंधित विभागप्रमुखांना सादर झाले असून, त्यांच्याकडून अद्याप अभिप्राय नोंदविलेला नसल्याने, ते "सामान्य'ला प्राप्त झालेले नाहीत. 

जिल्हा परिषदेतील एका विभागात खासगी व्यक्तीची नियुक्ती करून त्याच्याकडून कार्यालयीन कामकाज करून घेतले जात होते. या संदर्भात सर्वसाधारण सभा, स्थायी व बांधकाम समितीतही चर्चा झाली. प्रशासनाकडून हे प्रकरण गांभीर्याने घेण्यात आले होते. या संदर्भात "सकाळ'ने आवाज उठविल्यानंतर प्रशासनाने कारवाईच्या हालचाली सुरू केल्या आहेत. तातडीने तीन कर्मचाऱ्यांना नोटिसा बजावून त्यांच्याकडून खुलासा मागविण्यात आला आहे.

हा खुलासा संबंधित विभागप्रमुखांकडे सादर करून, त्यांनी त्यावर आपला अभिप्राय नोंदवून तो सामान्य प्रशासन विभागाला सादर करावा, असे नोटिशीत सूचित केले होते. यासाठी सामान्य प्रशासन विभागाने तीन दिवसांची मुदत दिली होती.

मात्र, ही मुदत संपूनही अद्याप त्याबाबतचा कुठलाच अहवाल सामान्य प्रशासन विभागाला मिळाला नसून, त्या तीन जणांनी आपला खुलासा संबंधित विभागप्रमुखांकडे सादर केला असल्याची माहिती सामान्य प्रशासन विभागातून देण्यात आली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com