
अहमदनगर महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानात महिला बचत गटांना विविध प्रकारचे प्रशिक्षण देऊन त्यांच्याकडून वर्षभर विविध साहित्य व उत्पादानांची निर्मिती करण्यात येत आहे.
नगर ः कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन प्रयत्न करीत आहे. या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रत्येकाने मास्क वापरावे, असे आवाहन केले जात आहे. हीच बाब ओळखून जिल्ह्यातील 114 बचत गटांनी मास्कची निर्मिती केली. त्यातून त्यांना 67 लाखाचे उत्पन्न मिळाले.
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानात महिला बचत गटांना विविध प्रकारचे प्रशिक्षण देऊन त्यांच्याकडून वर्षभर विविध साहित्य व उत्पादानांची निर्मिती करण्यात येत आहे.
यासाठी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणे अंतर्गत महिला बचत गटांनी तयार केलेल्या मालाच्या मार्केटिंगसाठी जिल्हास्तरावर मार्केटिंग अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे महिला बचत गटांच्या उत्पादीत मालाला बाजारपेठ उपलब्ध होत आहे.
कोरोना विषाणूमुळे मास्कला एप्रिल महिन्यात मागणी वाढली होती. मागणी जास्त व पुरवठा कमी अशी स्थिती असल्यामुळे ग्रामीण भागाताली महिलांनी कॉटनचे मास्क तयार करण्यात सुरवात केली आहे. जिल्ह्यातील 114 बचत गटाच्या 920 सदस्यांनी पाच लाख 20 हजार मास्कची निर्मिती केली. त्यातील पाच लाख तीन हजार मास्कची विक्री झाली आहे. त्यातून 67 लाख पाच हजारांचे उत्पन्न या बचत गटांना मिळालेले आहे.
मास्कला मागणी टिकून
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी जास्त होत आहे. त्यामुळे बचत गटांनी सुरु केलेले मास्क निर्मितीचे कामे अद्यापही सुरु आहे. बचत गटांच्या मास्कला मागणीही टिकून आहे.