गटई व्यवसायिकांसाठी गुड न्यूज! पारनेर तालुक्यात सात लाखाची मदत

मार्तंड बुचुडे
Sunday, 30 August 2020

सरकारी पातळीवरून जिल्ह्यातील गटई व्यवसायिकांना पत्र्याच्या स्टॉल सात लाख रूपयांचे व रोख स्वरूपाचे पाचशे रुपये अनुदान प्राप्त झाले होते.

पारनेर (अहमदनगर) : सरकारी पातळीवरून जिल्ह्यातील गटई व्यवसायिकांना पत्र्याच्या स्टॉल सात लाख रूपयांचे व रोख स्वरूपाचे पाचशे रुपये अनुदान प्राप्त झाले होते. त्याचे वाटप तालुक्यातील गटई कामगारांना आमदार निलेश लंके यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. त्यामुळे या कामगारांना निवारा मिळाला असून त्यांना त्याच्या ऊद्योगासाठी या मुळे मोठी मदत झाली आहे.

जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाकडे 507 स्टॉल प्राप्त झालेले होते. त्यापैकी पारनेर तालुक्यासाठी सात लक्ष रूपयाचे गटई पत्र्याचे स्टॉल प्राप्त झालेले होते. राज्यामध्ये चामड्याच्या वस्तू व पादत्राणे दुरुस्तीच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात अनुसूचित जाती प्रवर्गातील व्यक्ती काम करत आहेत. त्यांचा उपजीविकेचा प्रश्न हा चामड्याच्या वस्तू व पादत्राणे दुरूस्तीच्या क्षेत्राशी निगडित आहे. सरकारकडून त्यांच्या व्यवसायासाठी अशा प्रकारे मदत केली जाते.

व्यवसायिकांना ऊन-वारा व पाऊस यापासून संरक्षण मिळावे व त्यांची आर्थिक उन्नती व्हावी त्या साठी हा उपक्रम सरकार राबवित असते. ही योजऩा नगरपरिषद, नगरपंचायत व ग्रामपंचायत क्षेत्रात राबविसी जाते. समाज कल्याण, सामाजिक न्याय व संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यामाने ही योजणा राबविण्यात येते. या वाटप प्रसंगी समाज कल्याण निरीक्षक बाबासाहेब देव्हारे, व्यवस्थापक एस.एन.तडवी , दिनेश औटी, विलास सोबले आदी मान्यवर उपस्थीत होते. 

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Seven lakh from MLA Nilesh Lanke in Parner taluka