नीलेश लंकेंच्या नावाची राज्याला मोहिनी; शरद पवार

ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याकडून कौतुक; हंगे येथे विविध विकासकामांचा प्रारंभ
Sharad Pawar Appreciate MLA Nilesh Lanke parner
Sharad Pawar Appreciate MLA Nilesh Lanke parneresakal

पारनेर : आमदार नीलेश लंके यांनी कोरोनासारख्या संकट काळात केलेल्या कामामुळे पारनेरचे नव्हे, तर राज्याचे नाव मोठे केले आहे. त्यामुळे आता आमची अडचण झाली आहे. मी राज्यात जेथे-जेथे कार्यक्रमांसाठी जातो, तेथे-तेथे लोक म्हणतात, की साहेब, तुमचा कार्यक्रम खूप चांगला झाला; पण पुढच्या वेळी आमदार नीलेश लंके यांना घेऊन या किंवा आमच्याकडे त्यांना पाठवा. राज्यभरातील लोकांना लंके कोण आहेत, हे पाहण्याची उत्सुकता लागली आहे, असे गौरवोद्‍गार माजी केंद्रीय मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी काढले.

पवार आज (गुरुवारी) हंगे येथे आमदार लंके यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सर्वधर्मीय मोफत सामुदायिक विवाह सोहळ्यासाठी आले होते. त्यावेळी बोलत होते. या वेळी हंगे परिसरातील सुमारे १२ कोटी रुपयांच्या कामांचे भूमिपूजनही पवार यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी माजी आमदार दादा कळमकर, आमदार नीलेश लंके, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा राजश्री घुले, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, मंजूषा गुंड, महेबूब शेख, तालुकाध्यक्ष बाबाजी तरटे, बाजार समिती सभापती प्रशांत गायकवाड, सुदाम पवार, नगराध्यक्ष विजय सदाशिव औटी आदी उपस्थित होते.

पवार म्हणाले, की आमदार लंके यांच्या कोरोना काळातील कामाची दखल देशभरात घेतली गेली. त्यामुळे लोकांमध्ये त्यांचे नाव खूप मोठे झाले आहे. त्यांनी फक्त गोडधोड जेवण घालून वाढदिवस साजरा नाही केला, तर सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करून अनेकांचे संसार सुखी केले आहेत. अशी चांगली कामे करणाऱ्या लंके यांचा कार्यक्रम चुकवायचा नाही, अशी आमची भूमिका आहे, असेही या वेळी पवार म्हणाले.

या वेळी लंके म्हणाले, की आम्ही सर्वधर्मीय विवाह सोहळा आयोजित केला. यात १४ दिव्यांगांचा विवाह होत आहे. ते फक्त मतदारसंघातील नाहीत, तर राज्यातून आलेले आहेत. ज्येष्ठ नेते पवार साहेब कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले, हा आमच्यासाठी भाग्याचा दिवस आहे. तुमचा आदर्श घेऊन आम्ही काम करत आहोत. तुमच्यामुळे आम्हाला सुमारे साडेचारशे कोटींचा निधी मिळाला आहे.

पाचशे कर्करुग्णांवर होणार मोफत उपचार

आमदार नीलेश लंके यांच्या वाढदिवसानिमित्त गरजू पाचशे कर्करुग्णांवर मोफत उपचार करण्यात येणार आहेत, तसेच गरीब पाचशे विद्यार्थ्यांना मोफत सायकलींचे वाटप करण्यात आले..आम्ही अनेकांचे वाढदिवस पाहिले. मात्र, वाढदिवसानिमित्त सामुदायिक विवाह सोहळा करणारा हा एकमेव आमदार आहे. वाढदिवसासाठी पवार साहेब आले आहेत. त्यांनी असे चांगले काम करणाऱ्यांसाठी लवकरच एक चांगली बातमी द्यावी.

- दादा कळमकर, माजी आमदार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com