esakal | चोरट्यांनी पहाटे फोडलं घरं; लाखोंचा ऐवज लंपास
sakal

बोलून बातमी शोधा

In Shevgaon, thieves stole jewelery and cash worth Rs three lakh.jpg

सकाळी उठल्यावर घरात चोरी झाल्याचे धूत कुटूंबियांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी पोलिसांना माहिती दिली. परिसरातील साई मंदिरातील सी.सी.टीव्ही फुटेजमध्ये रात्री सात ते आठ जण फिरत असल्याचे निदर्शनास आले.

चोरट्यांनी पहाटे फोडलं घरं; लाखोंचा ऐवज लंपास

sakal_logo
By
सचिन सातपुते

शेवगाव (अहमदनगर) : शहरातील श्रीराम कॉलनी येथे राजेंद्र धूत यांच्या घरामध्ये कपाटाची उचकापाचक करुन चोरटयांनी दागिने व रोख रक्कम चोरी केले आहेत. दुस-या मजल्यावरील घरात प्रवेश करत चोरटयांनी आठ तोळे सोन्याचे दागिने आणि ८० हजार रुपयांची रोख रक्कम असा तीन लाख ३० हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना मंगळवार (ता.१६) रोजी पहाटे शेवगाव शहरात घडली. शहराच्या मध्यवस्तीत श्रीराम कॉलनी येथे राहणा-या राजेंद्र माधवलाल धूत (वय-४८) यांच्या घरामध्ये झालेल्या चोरीची फिर्याद त्यांचे भाऊ रामेश्वर माधवलाल धूत ( वय-३९) यांनी दिली. या फिर्यादीवरुन पोलिसांनी अज्ञात चोरटयांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत समजलेली माहिती अशी की, राजेंद्र माधवलाल धूत हे पत्नी सुचिता व मुलगी मिताली यांच्यासह आयुर्वेद महाविदयालय रस्त्यावरील श्रीराम कॉलनी येथे दुस-या मजल्यावर राहत असून ते तिघेही मुकबधीर आहेत. तर त्यांचे भाऊ रामेश्वर धुत हे आई, वडील, पत्नी, एक मुलगा व एक मुलगी अशा सहा जणांसमवेत त्याच इमारतीत तळ मजल्यावर राहतात. सोमवार (ता.१४) रोजी धुत कुटूंबीय रात्री जेवण करुन हॉलमध्ये झोपले होते. मंगळवार (ता.१५) रोजी पहाटे २ ते ३.३० च्या दरम्यान चोरटयांनी दुस-या मजल्यावर प्रवेश केला.

थांबा थोडं, तुमच्या जिल्हा बँकेतील गडबडी बाहेर काढतो, अजितदादांच्या इशाऱ्याने सहकार 'अलर्ट'

त्यानंतर घरातील किचन व धूत कुटूंबीय झोपलेल्या हॉलच्या दरवाजाला बाहेरुन कडी लावत बेडरुममध्ये प्रवेश केला. तेथील कपाटातील सामानांची उचकापाचक करुन २ लाख ५० हजार रुपये किमतीचे ८ तोळे सोन्याचे दागिने व रोख ८० हजार रुपये असा सुमारे तीन लाख ३० हजार रुपयांचा ऐवज चोरटयांनी पसार केला. सकाळी उठल्यावर घरात चोरी झाल्याचे धूत कुटूंबियांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी पोलिसांना माहिती दिली. परिसरातील साई मंदिरातील सी.सी.टीव्ही फुटेजमध्ये रात्री सात ते आठ जण फिरत असल्याचे निदर्शनास आले.

दरम्यान घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिस निरीक्षक प्रभाकर पाटील, पोलिस उपनिरीक्षक सोपान गोरे, पो.ना. सुधाकर दराडे यांनी समक्ष जावून पाहणी केली. नगरसेवक सागर फडके, संतोष व्यवहारे, कैलास बोधले, संजय बोरुडे, सनी देशमुख आदींनी पोलिसांना सहकार्य केले. नगर येथील श्वान पथकाने घरापासून थोडया अंतरापर्यंत मार्ग दाखवला.

या चोरी बरोबरच सात ते आठ जणांच्या संख्येत असलेल्या चोरटयांनी सोमवारी रात्री श्रीराम कॉलनी परिसरात आणखी काही ठिकाणी चोरीचा प्रयत्न केला. मात्र नागरिकांच्या सतर्कतेमुळे चोरीचा प्रयत्न फसला. याच भागात उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन मुंढे यांचेही निवासस्थान असल्याने चोरटयांचे धाडस दिवसेंदिवस वाढत असल्याने नागरिक भितीच्या सावटाखाली आहेत.