राष्ट्रवादीने केलेली घरफोडी शिवसेना विसरणार नाही, अौटींची भूमिका

सनी सोनावळे
Sunday, 5 July 2020

"सकाळ'शी बोलताना औटी म्हणाले, ""विधानसभा सदस्य असताना, माझ्या पाठपुराव्याने नगरपंचायतीची स्थापना झाली. त्यानंतर निवडणूक झाली. जनतेने माझ्याकडे पाहून या नगरसेवकांना मतदान केले.

टाकळी ढोकेश्वर : ""शिवसेना, कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस या तीन पक्षांचे महाविकास आघाडी सरकार राज्यात आहे. शिवसेनेचे नगरसेवक फोडून ते राष्ट्रवादीत घेतले. ही फोडाफोडी खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झाली.

या पक्षप्रवेशाविषयी शिवसेनेच्या शिस्तीप्रमाणे मी प्रतिक्रिया देणे योग्य नाही. त्यावर वरिष्ठ नेतेच बोलतील. मात्र, राष्ट्रवादी कोणत्या दिशेने चालली आहे, याबाबत शिवसेनेचे वरिष्ठ नेते जाणून आहेत,'' असे सांगून माजी आमदार विजय औटी यांनी राष्ट्रवादीलाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले.

हेही वाचा - या सालगड्याचा मुलगा असा झाला मंत्री

"सकाळ'शी बोलताना औटी म्हणाले, ""विधानसभा सदस्य असताना, माझ्या पाठपुराव्याने नगरपंचायतीची स्थापना झाली. त्यानंतर निवडणूक झाली. जनतेने माझ्याकडे पाहून या नगरसेवकांना मतदान केले. मोठ्या प्रमाणात निधी आणून विकासकामे केली. मी कुठेच कमी पडलो नाही. मात्र, हे नगरसेवक स्वार्थासाठी तिकडे गेले का, हे पुढील निवडणुकीत जनता ठरवील. त्यावर मी काही बोलणार नाही.

प्रत्येक पक्षाचे काही संकेत असतात. तसे शिवसेनेचेही आहेत. शिवसेना शिस्त पाळणारा पक्ष आहे. त्यामुळे पक्षाचे प्रवक्ते व वरिष्ठ नेतेच या पक्षप्रवेशाविषयी बोलतील.'' 

क्लिक करा -आजोबाच निघाला नातवाचा मारेकरी

""राज्यात तिन्ही पक्षांचे एकत्र सरकार आहे. राष्ट्रवादी आपला पक्ष कशा पद्धतीने वाढवीत आहे, हे वरिष्ठांना समजले आहे. याबाबत काय करायचे व काय भूमिका घ्यायची, हे वरिष्ठ नेते ठरवतील,'' असेही औटी म्हणाले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shiv Sena will not forget the deeds done by NCP