श्रीगोंद्यात कोरोनाचे 371 रुग्ण; सहा जणांचा मृत्यू, पोलिसही पॉझिटिव्ह

संजय आ. काटे
Saturday, 8 August 2020

दोन महिन्यांपुर्वी कोरोना रोखण्यात यशस्वी ठरलेल्या श्रीगोंदयात सध्या 371 कोरोनाबाधित रुग्ण झाले आहेत.

श्रीगोंदे (अहमदनगर) : दोन महिन्यांपुर्वी कोरोना रोखण्यात यशस्वी ठरलेल्या श्रीगोंदयात सध्या 371 कोरोनाबाधित रुग्ण झाले आहेत. त्यातील 76 जण उपचार घेत आहेत. कोरोनाबाधित झाल्यानंतर सहा जणांचा मृत्यू झाला आहे. श्रीगोंदे शहर व काष्टीत रुग्णांची संख्या जास्त आहे. 

गेल्या आठवड्यापासून कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या श्रीगोंदेकरांना धडकी भरवित आहे. तालुक्यात कोरोनाचे वाढते रुग्ण प्रशासनासोबतच सामान्यांची डोकेदुखी झाली आहे. दोन महिन्यांपुर्वी कोरोना तालुक्यापासून लांब होता. पुणे लगत असतानाही कोरोनाला रोखण्यात यश मिळत होते. मात्र पुणे व मुबंईचे कनेक्शन सुरु झाले आणि आकडा वाढत गेला. त्यातच रॅपिड अंन्टेजिन टेस्ट सुरु झाल्यानंतर कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत कमालिची वाढ झाली आहे. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात 174 रुग्ण वाढले आहेत. 

आत्तापर्यंत तालुक्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 371 वर पोचली आहे. त्यात शहरातील 80 आणि काष्टी येथे 45 अशी सर्वाधिक संख्या असल्याची माहिती आरोग्य यंत्रणेने दिली. दरम्यान 371 कोरोबाधित रुग्णांपैकी 295 जण ठणठणीत झाले असल्याने प्रत्यक्षात 76 जण उपचार घेत आहेत. मात्र रोज कोरोनाबाधितांच्या संख्येत होणारी भली मोठी वाढ थांबत नाही. त्यातच श्रीगोंदे, येळपणे, बेलवंडी, तांदळीदुमाला, उखलगाव, खरातवाडी येथे कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 

पोलिस ठाण्यात झाला शिरकाव....
श्रीगोंदे पोलिस ठाण्यातही कोरोनाचा आज शिरकाव झाला. एका अधिकाऱ्यासह कर्मचाऱ्याला कोरोना झाला आहे. त्यामुळे पोलिसांचीही काळजी वाढली आहे. 

एकुण कोरोबाधित : 371
बरे झालेले : 295
रॅपिड टेस्ट संख्या : 1307 
घशाचा स्त्राव घेवून तपासणी झालेल्या व्यक्ती : 980 

कोरोना झपाट्याने वाढत असला तरी रुग्ण बरे होण्याचे प्रमाण चांगले आहे. त्यामुळे घाबरुन जावू नये. काळजी घेतली तर काही दिवसात तालुका पुर्वपदावर येईल.
- डॉ. नितीन खामकर, 
तालुका आरोग्य अधिकारी, श्रीगोंदे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Shrigonda there are 371 corona patients and six have died