श्रीरामपुरातील शाईचा कारखाना पेटला; मोठमोठ्या स्फोटानं परिसर हादरला

आगीमध्ये कंपनी पूर्णपणे जळून खाक सुदैवाने जीवितहानी टळली
 Surface Coating Company caught fire
Surface Coating Company caught firesakal

श्रीरामपूर : येथील एमआयडीसीमध्ये प्रिंटिंग करता लागणारी शाई बनविणाऱ्या 'सरफेस कोटिंग' या कंपनीला आज सकाळी ११ वाजेच्या सुमारास मोठ्या प्रमाणात आग लागली. या आगीमध्ये कंपनी पूर्णपणे जळून खाक झाली आहे. सुमारे तीन ते चार कोटिंचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. सुदैवाने जीवितहानी टळली.

येथील एमआयडीसीमध्ये कृष्णा यादव यांची प्लॉट नं. सी-८९ मध्ये 'सरफेस कोटिंग' नावाने प्रिंटिंगसाठी लागणारी शाई बनविली जात होती. सकाळी ११ वाजेच्या सुमारास रोजच्याप्रमाणे काम सुरू असताना अचानकपणे आग लागली.

यावेळी यादव व कंपनीतील तीन ते चार कर्मचाऱ्यांनी आग विरोधक नळकांडेही फोडले. मात्र, आग आटोक्यात येत नसल्याने त्यांनी बाहेरच्या दिशेने पळ काढला. यानंतर आगीने रौद्ररूप धारण केले. मोठमोठे स्फोट होत होते. आग विझवण्यासाठी श्रीरामपूर नगरपालिका, अशोक कारखाना, गणेश कारखाना, देवळाली प्रवरा नगरपालिकेचे अग्निशामक बंम्बाना तातडीने पाचारण करण्यात आले होते. तसेच साई संस्थांचा फोमाचा बंम्बही घटनास्थळी दाखल झाली. दुपारी तीन वाजेपर्यंत आग विझविण्याचे काम सुरू होते.

दरम्यान, घटनेची माहिती समजताच प्रांताधिकारी अनिल पवार, पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके, शहर पोलीस निरीक्षक संजय सानप, तहसीलदार प्रशांत पाटील, आमदार लहू कानडे, ज्येष्ठ नेते इंद्रनाथ थोरात, ज्ञानेश्वर मुरकुटे, एमआयडीसीतील उद्योजक बाबासाहेब काळे यांच्यासह अन्य उद्योजक, एमआयडीसीचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने परिसरातील वीज बंद केली. सदर उद्योजकाने कंपनीचा कोणताही विमा उतरविलेला नसल्याचे समजते. तसेच आगीचे नेमके कारण समजले नसून संबंधित अधिकाऱ्यांकडून तपासणीनंतरच याबाबत माहिती मिळेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com