नगरच्या घरफोडीच्या गुन्ह्यात सिन्नरचा आरोपी अटकेत

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 12 December 2020

अकोले तालुक्‍यातील देवठाण येथील संजय शिवनाथ शेळके यांची मोबाईल शॉपी फोडून 22 हजार 590 रुपयांचा मुद्देमाल कोणी तरी लंपास केला. 

नगर : स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने मोबाईल दुकान घरफोडीच्या गुन्ह्यात सिन्नर (जि. नाशिक) येथून एकाला अटक केली. त्याच्याकडून एक मोबाईल जप्त करण्यात असून, अन्य आरोपींची नावेही निष्पन्न झाली आहेत. 

योगेश काळू निरगुडे असे अटक झालेल्या आरोपीचे नाव आहे. मयूर अशोक कातोरे, सोमनाथ कातोरे, अमोल भाऊराव भगत (सर्व रा. शिवडी, ता. सिन्नर, जि. नाशिक) अशी पसार असलेल्या आरोपींची नावे आहेत. 

हेही वाचा - नगरचे कलेक्टर राहतात महालात

अकोले तालुक्‍यातील देवठाण येथील संजय शिवनाथ शेळके यांची मोबाईल शॉपी फोडून 22 हजार 590 रुपयांचा मुद्देमाल कोणी तरी लंपास केला. याप्रकरणी अकोले पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

या गुन्ह्यातील आरोपी शिवडे (ता. सिन्नर) येथील असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक अनिल कटके यांना मिळाली. त्यानुसार पोलिस पथकाने शिवडे येथे छापा घालून योगेश काळू निरगुडे याला ताब्यात घेतले. चौकशी केली असता त्याने अन्य तीन आरोपींची नावे सांगितली.

पोलिसांनी त्याच्याकडून एक मोबाईल जप्त केला. पोलिसांनी आरोपींचा शोध घेतला; मात्र ते सापडले नाही. 
...... 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sinnar accused of burglary arrested