
कृषी आणि कामगार कायदे मागे घेण्यासाठी दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनास पाठिंबा देत येथील छत्रपती संभाजी चौकात आंदोलन झाले.
श्रीरामपूर (अहमदनगर) : कृषी आणि कामगार कायदे मागे घेण्यासाठी दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनास पाठिंबा देत येथील छत्रपती संभाजी चौकात आंदोलन झाले. या वेळी तहसीलदार प्रशांत पाटील यांना कामगार संघटनेतर्फे निवेदन देण्यात आले. पोलिसांनी सहा आंदोलकांवर गुन्हे दाखल केले.
कामगार नेते नागेश सामंत यांच्या नेतृत्वाखाली एमआयडीसी कामगार, हमाल-माथाडी कामगार, महाबीज कामगार, सिमेंट कामगार संघटना, पेठ हमाल-माथाडी कामगार, शेतमजूर, हातगाडी कामगार, रिक्षा कामगार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी निषेध केला.
आंदोलकांनी सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले. नागेश सामंत यांच्यासह सहा आंदोलकांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलिसांनी दिली. कामगार नेते नागेश सावंत, राजेंद्र भोसले, जलील शहा, भरत जाधव, विष्णू भागवत, जनार्दन भवर, भारती शिंदे, सिंधू बनकर, ज्योती राठोड यांनी आंदोलनात भाग घेऊन केंद्र सरकारच्या धोरणांचा निषेध केला.
संपादन : अशोक मुरुमकर