कर्जत येथे 'आपले गाव, आपला रोजगार' या योजनेचा शुभारंभ

SNR Small and Medium Enterprises Development Group has launched 'Aaple Gaon, Aapla Rozgar' scheme at Karjat..jpg
SNR Small and Medium Enterprises Development Group has launched 'Aaple Gaon, Aapla Rozgar' scheme at Karjat..jpg

कर्जत (अहमदनगर)  : उपेक्षितांचे आशीर्वाद हीच खरी मौलिक संपत्ती आहे. महिला सक्षमीकरण आणि सबलीकरणासाठी एस एन आर च्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या सर्व उपक्रमात प्रवरा परिवार खंबीरपणे पाठीशी उभा राहील, अशी ग्वाही खासदार डॉ सुजय विखे पाटील यांनी दिली.

येथे एस एन आर लघु व मध्यम उद्योग विकास समूहाच्या वतीने प्रथम नगराध्यक्ष नामदेव राऊत यांच्या संकल्पनेतून 'आपले गाव, आपला रोजगार' या योजनेचा शुभारंभावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते तर भामबाई राऊत, नगराध्यक्षा प्रतिभा भैमुले, उपनगराध्यक्ष नामदेव राऊत, रिपाईचे तालुकाध्यक्ष संजय भैलूमे, भाजपचे शहराध्यक्ष वैभव शहा, युवा मोर्चाचे विनोद दळवी, अमृत काळदाते, अनिल गदादे,  नगसेविका उषा राऊत, राखी शहा, नीता कचरे, हर्षदा काळदाते, डॉ कांचन खेत्रे, आशा वाघ, सुनीता हिरडे व सर्व नगरसेविका महिला यावेळी उपस्थित होत्या.

ते म्हणाले, महिला सक्षमीकरण, स्वावलंबन आणि सबलीकरणासाठी घोषणाबाजी करणे सोपे, कृती करणे अवघड आहे. त्यासाठी आवश्यक ते भांडवल, मनुष्यबळ आणि इच्छाशक्ती लागते, ती नामदेव राऊत यांच्या माध्यमातून या प्रकल्पाद्वारे कृतीत उतरली जात आहे. यावेळी प्रशिक्षिका सुनीता हिरडे, तबसुम शेख यांची भाषणे झाली. प्रास्ताविक उषा राऊत यांनी केले तर उपस्थितांचे आभार नगरसेविका राखी शहा यांनी मानले.

शहरात या पूर्वी कापड दुकानात महिलांना काम करावे लागायचे किंवा शेतात मोलमजुरी मात्र या उपक्रमामुळे महिलांना घरच्या घरीच काम उपलब्ध होऊन स्वयंरोजगार मिळून अर्थार्जन होणार आहे. ही सर्व घरातील कामे करून फावल्या वेळात करता येणार असल्याने महिलांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे.

संपादन - सुस्मिता वडतिले 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com