SSC Exam 2023 News: दहावीच्या इंग्रजीच्या पेपरला ९३३ जणांची दांडी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

SSC Exam 2023 News

दहावीच्या इंग्रजीच्या पेपरला चार जण कॉपी करताना आढळले. त्यांच्यावर बोर्डाच्या नियमानुसार कारवाई करण्यात आली आहे.

SSC Exam 2023: दहावीच्या इंग्रजीच्या पेपरला ९३३ जणांची दांडी

अहमदनगर - दहावीच्या इंग्रजीच्या पेपरला चार जण कॉपी करताना आढळले. त्यांच्यावर बोर्डाच्या नियमानुसार कारवाई करण्यात आली आहे.

बारावीच्या इंग्रजी विषयाच्या पेपरलाही कॉपी केस करण्यात आल्या होत्या. या परीक्षेसाठी ६८ हजार २४८ जणांनी अर्ज केले होते. त्यांपैकी ६७ हजार २८४ जणांनीच आजचा पेपर दिला. तब्बल ९३३ विद्यार्थ्यांनी दांडी मारली.

दहावी आणि बारावीची परीक्षा एकाच वेळी सुरू आहे. कॉपीमुक्तीला आळा घालण्यासाठी प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण विभागाने बैठी, तसेच भरारी पथके तैनात केली आहेत. तरीही काही विद्यालयांत कॉपीचे प्रकार घडत आहेत. विशेषतः पाथर्डी तालुक्यात कॉपी केस सापडत आहेत.

पाथर्डीच्या विद्यालयात महसूलच्या तालुकास्तरीय भरारी पथकाने दोन, तर शिक्षण विभागाच्या तालुकास्तरीय पथकानेही दोन, अशा चार विद्यार्थ्यांवर कॉपीप्रकरणी कारवाई केली आहे. मराठीसोबत इंग्रजीच्या पेपरला गैरहजर राहणाऱ्या विद्यार्थ्यांचा आकडा मोठा आहे.

भाऊसाहेब फिरोदियात ३२, रेसिडेन्शिअलमध्ये २४, सोमय्या, श्रीरामपूर - ८१, ज्ञानमाता, संगमनेर - ८४, एस. जी. विद्यालय, कोपरगाव - ८१, निऱ्हाळी, पाथर्डी - ११५, महात्मा गांधी, कर्जत - ३४, अकोले कनिष्ठ महाविद्यालय, ८२, रेसिडेन्शिअल, शेवगाव - २६, सुंदराबाई गांधी विद्या मंदिर, नेवासा - ६९, विद्यामंदिर प्रशाला, राहुरी - ३५, न्यू इंग्लिश स्कूल, पारनेर - ३४, श्रीमंत महादजी शिंदे विद्यालय, श्रीगोंदा - ७१, ल.ना. होशिंग विद्यालय, जामखेड -२२, सेंट जॉन हायस्कूल, राहाता - ५९, महर्षी ग. ज. चितांबर, नगर - ३१, डी.एम. पेटिट, संगमनेर - ३१, घोडेश्वरी माध्यमिक विद्या मंदिर, घोडेगाव - ३१.