बाळासाहेब नाहाटांना अटक, राष्ट्रवादीने अडकवल्याचा आरोप

balasaheb nahata
balasaheb nahata

श्रीगोंदे : राज्य बाजार समितीचे संचालक बाळासाहेब नाहाटा यांनी येथील पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रशांत काळे यांना शिवीगाळ करीत ते बसलेल्या सरकारी वाहनातून खाली ओढत त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. लोणी व्यंकनाथ ग्रामपंचायतीच्या सरपंचाविरुध्द अपात्रेचा प्रस्ताव पाठवू नये यासाठी ही मारहाण झाल्याचा आरोप करीत काळे यांनी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनंतर नाहाटा यांच्याविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी नाहाटा यांना अटक केली आहे.

ही घटना पंचायत समितीच्या सभागृह व आवारात घडली. याबाबत काळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन नाहाटा यांच्याविरुध्द सरकारी कामात अडथळा आणला, शिवीगाळ या कलमांअंतर्गत गुन्हा दाखल केला. (State Market Committee Director Balasaheb Nahata arrested)

balasaheb nahata
भाजप सरकारने मला नि कुटुंबालाही छळलं, मंत्र्यांचा गौप्यस्फोट

काळे यांनी म्हटले आहे की, लोणी व्यंकनाथ ग्रामपंचायतीची तपासणी करून सरपंच अपात्रतेचा प्रस्ताव हा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अहमदनगर यांना सादर करू नये, असे नाहाटा यांचे म्हणणे होते. याच कारणावरुन काल दुपारी नाहाटा पंचायत समितीच्या सभागृहात काळे यांच्याकडे आले. हा प्रस्ताव पाठवू नये या कारणावरून नाहाटा यांनी काळे यांना शिवीगाळ सुरू केली.

या घटनेनंतर काळे नाहाटा यांच्याविरुध्द फिर्याद देण्यासाठी पोलिस ठाण्याकडे निघाल्यावर त्यांच्या सरकारी वाहनाच्या दिशेने नाहाटा यांनी पायातील बूट काढून फेकून मारला. तसेच वाहनाचा दरवाजा उघडून काळे यांना बाहेर ओढून जीवे मारण्याची धमकी दिली.

आपण केवळ चर्चा करण्यासाठी गेलो होतो, तेथे काहीही घडलेले नाही. मात्र, राष्ट्रवादीच्या एका नेत्याच्या सांगण्यावरुन काळे यांनी आपल्याविरुध्द खोटा गुन्हा दाखल केला आहे. जामीन घेतल्यावर या प्रकरणाचा पर्दाफाश करणार आहे.

- बाळासाहेब नाहाटा, संचालक बाजार समिती.

श्रीगोंद्यात काम करताना कधीच सामान्यांना त्रास होणार नाही याची दक्षता घेतली. नाहाटा यांनी आपल्याला अत्यंत खालच्या पातळीवर शिवीगाळ करीत जीवे मारण्याचा प्रयत्न केला. प्रामाणिक व शिंतोडा उडू न देता केलेल्या कामाचे हे असे फळ मिळाले याचे वाईट वाटते. कुणाच्या सांगण्यावरुन नव्हे तर नाहाटांनी केलेल्या कृतीमुळे फिर्याद दिली.

- प्रशांत काळे, गटविकास अधिकारी पंचायत समिती श्रीगोंदे.

(State Market Committee Director Balasaheb Nahata arrested)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com