esakal | मराठा आरक्षणाबाबतची सुनावणी लवकर घेऊन सकारत्मक निर्णयासाठी सरकारने प्रयत्न करावेत
sakal

बोलून बातमी शोधा

Statement on behalf of Maratha community to Tehsildar of Kopargaon

मराठा आरक्षणाबाबत घटना पिठाने आरक्षणाबाबतची सुनावणी लवकरात लवकर व सलग घेवुन सकारात्मक निर्णय घ्यावा, यासाठी सरकारने योग्य ती यंत्रणा उभी करून सुनावणीचा पाठपुरावा करावा, अशी मागणी सुमित कोल्हे यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन सकल मराठा समाजाच्यावतीने कार्यकर्यांसह तहसीलदार यांना दिले.

मराठा आरक्षणाबाबतची सुनावणी लवकर घेऊन सकारत्मक निर्णयासाठी सरकारने प्रयत्न करावेत

sakal_logo
By
मनोज जोशी

कोपरगाव (अहमदनगर) : मराठा आरक्षणाबाबत घटना पिठाने आरक्षणाबाबतची सुनावणी लवकरात लवकर व सलग घेवुन सकारात्मक निर्णय घ्यावा, यासाठी सरकारने योग्य ती यंत्रणा उभी करून सुनावणीचा पाठपुरावा करावा, अशी मागणी सुमित कोल्हे यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन सकल मराठा समाजाच्यावतीने कार्यकर्यांसह तहसीलदार यांना दिले.

नायब तहसिलदार मनिषा कुलकर्णी यांनी निवेदन स्वीकारले. यावेळीं माजी शिवसेना शहर प्रमुख भरत मोरे, मनसे तालुका अध्यक्ष अनिल गायकवाड, माजी उपनगराध्यक्ष विजय वाजे, माजी नगरसेवक कृष्णा आढाव, राष्ट्रवादी काँग्रेस शहर उपअध्यक्ष अशोक आव्हाटे, नगरसेवक स्वप्नील निखाडे, बाळासाहेब आढाव,विजय आढाव, रवी रोहमारे, दिनेश पवार, अमोल भाकरे, स्वप्नील औताडे, आदी कोविड 19 चे मार्गदर्शक तत्वे पाळुन उपस्थित होते.

निवेदनात पुढे म्हटले आहे की जोपर्यंत घटनापिठाची सुनावणी पुर्ण होत नाही तो पर्यंत आरक्षण निर्णय स्थगित होवुन नोकरी व शिक्षण यामध्ये मराठा समाजास आरक्षणाचा लाभ घेता येणार नसल्यामुळे आधीच हलाखीच्या परीस्थितीत असणाऱ्या मराठा समाजाचे मोठे नुकसान होणार आहे. हे टाळण्यासाठी शासनाने जलद सुनावणीसाठी स्वतंत्र यंत्रणा उभी करून पाठपुरावा करावा, जेणे करून युवक वर्गाचे शैक्षणिक व नोकरीत होणारे नुकसान टळून मराठा समाजास योग्य तो न्याय मिळेल.

सुमित कोल्हे म्हणाले,सरकारी नोकऱ्या तसेच शैक्षणिक प्रवेशात तत्कालीन महाराष्ट्र सरकारने 1 डिसेंबर, 2018 पासुन राज्यात मराठा आरक्षण लागु केले. मराठा आरक्षण मिळविण्यासाठी समाजाने मोठा त्याग केला आहे. अनेकांना स्वतःचे आयुष्य आरक्षणासाठी संपविले. आता कुठे या आरक्षणाच्या निमित्ताने दिलासा मिळत असताना पुन्हा याला स्थगिती मिळाली. मात्र न्याय देवता मराठा समाजाच्या बाजुने सर्व बाजु तपासुन कौल देईल असे ही शेवटी कोल्हे म्हणाले.

संपादन : अशोक मुरुमकर