रुग्ण सेवेबरोबरच डॉ. कविता आरगडे यांनी जोपासला पेंटिंगचा छंद..!

The story of Doctor Kavita Argade Painting
The story of Doctor Kavita Argade Painting

नेवासे (अहमदनगर) : कोरोना विषाणू संसर्गामुळे काही डॉक्टरांनी घरीच बसने सुरक्षिततेचे समजले. मात्र, सौंदळे (ता. नेवासे) येथील डॉ. कविता आरगडे यांनी कोरोनाविरोधी लढ्यात आपलेही योगदान असावे म्हणून खाजगी रुग्णालयातील नोकरी सोडून जिल्हा आरोग्य विभागात कार्येरात झाल्या.  दरम्यान रुग्णसेवेबरोबरच त्यांनी मिळालेल्या वेळात आपला पेंटिंगचा छंद जोपासला आहे. विशेष म्हणजे त्यांनी चित्रकलेचे कोणतेही औपचारिक शिक्षण घेतलेले नाही.

जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या डॉ. कविता या नेवासे तालुक्यातील सौंदळे येथील कल्पना व बाळासाहेब आरगडे यांच्या कन्या. डॉ. कविता यांनी २०१८ मध्ये आपले  वैद्यकीय शिक्षण प्रवरा मेडिकल ट्रस्ट औयुर्वेद मेडिकल कॉलेजमध्ये शिक्षण पूर्ण केल्यावर त्यांनी कुकाणे, शेवगाव, नगर येथे खाजगी रुग्णालयात कामाचा अनुभव घेतला. दरम्यान २०२० मार्च-एप्रिलमध्ये कोरोना संसर्गाच्या काळात त्यांनी आपली खाजगी नोकरी सोडून जिल्हा रुग्णालयात रुजू झाल्या. दिवस-रात्र कोरोना रुग्णांची सेवा करत असतांनाच त्यांनी मिळेल त्यावेळात त्यांनी आपल्या लहानपणी पासूनच्या विविध प्रकारच्या  चित्रकलाचा छंद जोपासला.

हेही वाचा : १४ वर्षात पहिल्यांदाच मुळातून जायकवाडीला गेले १३ हजार दशलक्ष घनफूट पाणी
डॉ. कविता यांनी वॉटर कलर पेंटिंग, पेस्टल, आर्क पेंटिंग, पेन्सिल स्केच, इंक पेंटिंग, स्प्रे पेंटिंग, वरली पेंटिंग अशा विविध पेंटिंग प्रकारातून त्यांनी आपल्या कुंचल्यातून साकारले. विशेष म्हणजे डॉ. कविता यांनी चित्रकलेचे कोणतेही औपचारिक शिक्षण घेतलेले नाही. चित्रकलेचा कोणताही क्लास  लावला नव्हता. त्यांना बालपणापासून चित्र रेखाटण्याची आवड आहे. कोरोना महामारीच्या विरोधात लढतांना कामात व्यस्त असूनही मिळालेल्या फावल्या वेळात  त्यांना आपल्या जुन्या छंदाकडे वळण्यास वेळ मिळाला आणि आणि त्यांच्या कुंचल्यातून अनेक चित्र रेखाटली. 

ही रेखाटली चित्रे..!
डॉ. कविता यांच्या कुंचल्यातून विविध देवी-देवतांसह संत तुकाराम महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजीराजे, छत्रपती शाहू महाराज, संत ज्ञानेश्वर, स्वामी विवेकानंद, ज्येष्ठ नेते शरद पवार, (स्व) बाळासाहेब ठाकरे, लोकनेते मारुतराव घुले पाटील, गोपीनाथ मुंडे यांच्यासह निसर्ग चित्रे, पशु-पक्षी असे विविध चित्रे रेखाटली आहेत. विशेषतः त्यांची वारली पेंटिंग प्रसिद्ध आहे. 

अभ्यासाबरोबरच  मी विविध आत्मचरित्रे, कथा-कादंबऱ्या, ग्रंथ, नाटके वाचन करतेच पण त्याचबरोबर पेंटिंगचा छंद जोपासते,  यापुढेही जोपासणार आहे. 
- डॉ. कविता आरगडे, वैद्यकीय अधिकारी, जिल्हा रुग्णालय, नगर 

संपादन : अशोक मुरुमकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com