अधिकारी म्हणून नव्हे, तर सामाजिक बांधिलकी म्हणून कोरोनाशी संघर्ष

The story of Nirmala Sathe Rajur extension officer in Akole taluka
The story of Nirmala Sathe Rajur extension officer in Akole taluka

अकोले (अहमदनगर) : आपण विस्तार अधिकारी नव्हे तर एक सामाजिक बांधिलकीचे स्वप्न उराशी बाळगून कोरोनाशी संघर्ष करत आदिवासी व दर्गंम भाग असलेल्या वाडीवस्तीत जाऊन, शालेय पोषण आहार, ऑनलाइन शिक्षण, प्रवेश प्रक्रिया, अपडेट रेकॉर्ड, स्वच्छता, उपस्थिती यांची तपासणी करून  महिला अधिकारी निर्मला साठे कामाची चुणूक दाखवून झालेल्या चुकावर पांघरूण न घालत शिक्षकांच्या कामात बदल कसा होईल, त्यांचे प्रश्न समजून घेऊन त्यांना योग्य मार्गदर्शन करत आहेत.

गुणवत्ता वाढीचा कार्यक्रम हाती घेऊन सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत त्या काम करीत आहेत. खऱ्या अर्थाने शिक्षण क्षेत्रात अधिकाराचा रुबाब गाजवून आपल्या कार्यालयात सर्व माहिती बोलवून तेथूनच वरिष्ठ कार्यालयात माहिती पाठविणाऱ्या पाट्या टाकून आपले काम हातावेगळे करणाऱ्या बाबूच्या डोळ्यात अंजन घालणाऱ्या ठरल्या आहेत.

नारायणडोहो हे त्यांचे जन्म गाव आहे. त्यांचे शिक्षण M. A. (Eng) M.Ed.,L.L.B, SET (Edu.) झाले आहे. त्या शिक्षण विभागात (प्राथ) जिल्हा परिषद अहमदनगर येथे विस्तार अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्यांचे वडिल निवृत्त प्राथमिक शिक्षक आहेत. त्यामूळे शिक्षणक्षेत्राकडे ओढ होतीच. कायद्याचे शिक्षण घेवून मी त्यातच करिअर करावे अशी आईची इच्छा होती.

मधल्या काही काळात प्राथमिक शाळा, आकाशवाणी केंद्र, अध्यापक विदयालय, अशा विविध ठिकाणी काम करण्याची त्यांना संधी मिळाली.

ऑगस्टमध्ये बदलीने राजूरबीट आदिवासी क्षेत्र येथे त्या हजर झाल्या. बीटातील 18 शाळांना भेटी देवून मूख्याध्यापक, शिक्षक, काही विद्यार्थी, काही पालक यांचेशी संवाद साधला. त्यानुसार बीटातील काही शाळांमध्ये onlineवर्ग अध्यापन, Whatsapp group, Link ,video,online Test द्वारे शाळामध्ये अध्यापन सुरु केले. ज्या विद्यार्थ्याकडे ही साधने उपलब्ध नसतील त्यांना दिवसांचा अभ्यास हार्ड कॉपीद्वारे सर्व सुरक्षितता बाळगून दिला जातो.

त्या म्हणाल्या मी, वकिली करू शकले असते. पण माझे वडील प्राथमिक शिक्षक त्यामुळे मला घरातून संस्कार मिळाल्याने मी शिक्षण क्षेत्र निवडले. या कामात मी समाधानी आहे. तालुका आदिवासी व दुर्गम असला तरी येथील निसर्ग काश्मीर सारखा आहे. माणसे देखील समजून घेणारी आहेत. त्यामुळे या भागातील जिल्हा परिषद शाळा निश्चित चांगले व आदर्शवत काम करतील याचा मला विश्वास आहे.

संपादन : अशोक मुरुमकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com