जिल्हा प्रशासनाकडून लॉकडाउनची कडक अंमलबजावणी 

amc
amc

नगर : शहरात वाढती कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेऊन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी महापालिका आयुक्‍त व जिल्हा पोलिस अधीक्षक यांची काल जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीतून कानघाडणी केली. त्यामुळे आज पोलिस व महापालिका प्रशासनाने लॉकडाउनच्या नियमांची कडक अंमलबजावणी सुरू केली आहे. सोशल डिस्टन्सचे पालन न करणाऱ्या अनेकांना काठ्या व दंडाचा प्रसाद मिळाला. महापालिकेच्या पथकानेही शहरात अनेक ठिकाणी कारवाईचा समाटा लावला. 

शहरात लॉकडाउनचे नियम न पाळणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी महापालिका आयुक्‍त श्रीकांत मायकलवार यांनी व्हिजिलन्स स्क्‍वाड तयार केले आहे. या पथकात उपअभियंता रोहिदास सातपुते, यंत्र अभियंता परिमल निकम, उद्यानविभाग प्रमुख शशिकांत नजान, स्वच्छता निरीक्षक तुकाराम भांगरे, राजेंद्र सामल, गणेश लयचेट्टी, राहुल साबळे, बाळासाहेब पवार आदींची नेमणूक करण्यात आली आहे. या पथकाबरोबर पोलिस कर्मचारीही आहेत. या पथकाने शहरात सुमारे 22 ठिकाणी कारवाई केली. या पथकाने सायंकाळी सात वाजेपर्यंत 23 हजार 700 रुपयांचा दंड नागरिकांकडून वसुल केला आहे. शहरातील चौकांत भाजीविक्रेते सोशल डिस्टन्सचे पालन करत नसल्यास तसेच नागरिकांनी सोशल डिस्टन्सचे पालन न केल्यास त्यांना दंड करण्यात आला. शहरातील काही भागातील दुकाने सायंकाळी पाच नंतर बंद झाली नाहीत. अशा दुकानांवरही महापालिकेच्या पथकाने कारवाई केली अशी माहिती महापालिकेचे उपअभियंता आर.जी. सातपुते यांनी दिली. 

सायंकाळी सातनंतर शहरातील रस्त्यावर दिसणाऱ्या नागरिकांवर पोलिसांच्या पथकाने कारवाई केली. रस्त्यावर जागोजाग नाकेबंदी करून पोलिस पथके उभी होती. पोलिसांच्या या अचानक कारवाईमुळे शहरातील रस्ते काही मिनिटांत सुनसान झाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com