काय कारण असावं... तेरा वर्षांच्या मुलीची नऊ वर्षांच्या भावासमोर आत्महत्या

Suicide of a minor girl
Suicide of a minor girl

पारनेर ः मोठी माणसं मनाप्रमाणे एखादी गोष्ट झाली नाही, कर्जबाजारी, नैराश्य आलं किंवा आजार अशी कोणत्याही कारणाने आत्महत्या करतात. किंवा ठराविक असं एक कारण नसतं. परंतु हल्ली चिमुरडीही आत्महत्या करू लागली आहेत. त्या कारणांचा शोध घेतला आश्चर्याचा धक्का बसेल. ही कारणं समाजशास्त्रज्ञांना विचार करायला लावणारी आहेत.

निघोज येथील ओढ्याच्या कडेला असलेल्या आंब्याला दोरीने गळफास घेऊन 13 वर्षीय मुलीने आत्महत्याकेली. विशेष म्हणजे आपल्या 9 वर्षांच्या भावासमोरच तिने हे कृत्य केले. काय कारण असावं, असा प्रश्न पोलिसांनाही पडला आहे. ती आत्महत्या करीत असताना भावाने वाचण्याचा प्रयत्न केला होता. का अन्य तिसरेच कारण आहे, याचा पोलिस तपास करीत आहेत. पूजा झारदास भोसले असे तिचे नाव आहे.  


निघोज येथील पूजाने काल (ता. 27) सायंकाळी भावासमक्ष आंब्याला दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत माहिती समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. उत्तरीय तपसणीसाठी तिचा मृतदेह पारनेर येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविला. याबाबत पारनेर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते. घटनास्थळी सहायक पोलिस निरीक्षक राजेश गवळी यांनी भेट दिली. 

कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या 

नगर तालुका : तालुक्‍यातील दशमी गव्हाण येथील शेतकऱ्याने शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. दादा भाऊ शिंदे (वय 55) असे त्याचे नाव आहे. शिंदे यांच्यावर एक बॅंक व सहकारी संस्थेचे सुमारे सहा लाख रुपये कर्ज होते. कोरोनामुळे झालेली आर्थिक कोंडी व शेतीवरील संकटाने हतबल होऊन त्यांनी आत्महत्या केल्याचे समजते. 
दशमी गव्हाण येथील शेतात पिकाला पाणी देण्यासाठी शिंदे बुधवारी (ता. 27) रात्री गेले होते. मात्र, त्यांनी झाडाला गळफास घेतल्याचे वस्तीवरील लोकांना आज सकाळी दिसले. पोलिस पाटील जयसिंग काळे यांनी नगर तालुका पोलिसांना खबर केली. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठविला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com