पोलिसाची आत्महत्या; पत्नीसह पोलिस कर्मचाऱ्याविरुद्ध राहुरीत गुन्हा दाखल

विलास कुलकर्णी
Sunday, 22 November 2020

राहुरी पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्याने (शुक्रवारी) रात्री साडेआठ वाजता विषारी औषध प्राशन करून जीवनयात्रा संपविली.

राहुरी (अहमदनगर) : राहुरी पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्याने (शुक्रवारी) रात्री साडेआठ वाजता विषारी औषध प्राशन करून जीवनयात्रा संपविली. विशाल रामराव हापसे (वय 40, मूळ रा. देहरे, ता. नगर) असे त्यांचे नाव आहे. 

नगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
याबाबत राहुरी पोलिस ठाण्यात शनिवारी रात्री मृत विशाल हापसे यांच्या पत्नी सोनाली (वय 35, रा. देहरे) व पोलिस नाईक विशाल खंडागळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी पत्नी सोनालीला अटक केली असून, आरोपी खंडागळे पसार झाला आहे. 
श्रीरामपूर पोलिस ठाण्यातून दोन महिन्यांपूर्वीच विशाल हापसे यांची राहुरी पोलिस ठाण्यात बदली झाली होती. गोपनीय विभागात ते कार्यरत होते. शहरातील डुबीचा मळा येथे भाडोत्री घरात ते राहत होते.

आत्महत्येपूर्वी त्यांचे भावाबरोबर व्हिडिओ कॉलद्वारे संभाषण झाले. त्यानंतर त्यांनी घरातच विषारी औषध प्राशन केले. त्यांना तातडीने लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात हलविले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचे निधन झाले. 
देहरे येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके, पोलिस निरीक्षक हनुमंत गाडे व जिल्ह्यातील पोलिस कर्मचारी उपस्थित होते. (स्व.) विशाल यांच्या मागे आई, भाऊ, मुलगा, मुलगी, असा परिवार आहे. 

हेही वाचा : पोलिसांनी जप्त करायला दिलेल्या गो-मांसाची महापालिका कर्मचाऱ्यांकडून परस्पर विक्री
पत्नीचे अनैतिक संबंध 

याबाबत मृत विशाल यांचे बंधू देवेंद्र रामराव हापसे (वय 36, रा. देहरे) यांनी राहुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. तीत म्हटले आहे, की मृत भावाची पत्नी सोनाली हिचे पोलिस नाईक विशाल खंडागळे याच्याबरोबर अनैतिक संबंध होते. त्यात अडसर येत असल्याने त्यांनी भावाला जिवे मारण्याची धमकी दिली होती. त्यामुळे मानसिक तणावातून विशाल हापसे यांनी आत्महत्या केली. 

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Suicide of a police officer in Rahuri taluka