esakal | एकतर्फी प्रेमातून स्वतःवरच झाडली गोळी; ब्रेन डेड, ह्रदय धडधडत होतं
sakal

बोलून बातमी शोधा

Suicide of a young man out of one-sided love

देवळाली प्रवरा येथील तरुणीशी मुसमाडे याचे प्रेमसंबंध होते. मात्र, नंतर तिने लग्नाला नकार दिला. सर्व संबंध तोडले. विकी मात्र तिच्यावर एकतर्फी प्रेम करीत राहिला.

एकतर्फी प्रेमातून स्वतःवरच झाडली गोळी; ब्रेन डेड, ह्रदय धडधडत होतं

sakal_logo
By
विलास कुलकर्णी

राहुरी : एकतर्फी प्रेमातून देवळाली प्रवरा येथील एका तरुणीच्या घरात घुसून, तिच्यावर पिस्तुलातून गोळीबार करून, नंतर स्वतःच्या डोक्‍यात गोळी झाडणाऱ्या तरुणाचे काल (गुरुवारी) रात्री लोणी येथील रुग्णालयात निधन झाले. विक्रम ऊर्फ विकी रमेश मुसमाडे (वय 28, रा. देवळाली प्रवरा), असे त्याचे नाव आहे.

देवळाली प्रवरा येथील तरुणीशी मुसमाडे याचे प्रेमसंबंध होते. मात्र, नंतर तिने लग्नाला नकार दिला. सर्व संबंध तोडले. विकी मात्र तिच्यावर एकतर्फी प्रेम करीत राहिला. मंगळवारी (ता. 15) पहाटे तो तरुणीच्या घरात घुसला. लग्न न केल्यास जिवे मारण्याची धमकी दिली. त्या वेळी दोघांत बाचाबाची झाली.

हेही वाचा - आमदाराची ग्रामपंचायत शिपायाला मारहाण

रागाच्या भरात विकीने पिस्तुलातून तरुणीवर गोळी झाडली. त्याच वेळी तरुणीच्या आजीने त्याला ढकलल्याने नेम चुकला. तरुणीच्या कानाजवळून गोळी गेली. तिच्या डोक्‍याला किरकोळ जखम झाली. 
विकीने नंतर स्वतःच्या डोक्‍याला पिस्तूल लावले. रागाच्या भरात स्वतःवर गोळी झाडली.

तरुणीच्या घरातच तो कोसळला. मित्रांनी त्याला तातडीने लोणी येथे प्रवरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरू होण्यापूर्वी त्याचा मेंदू मृत झाला होता. मात्र, हृदय सुरू होते. काल (गुरुवारी) रात्री विकीचे निधन झाले. त्याच्या मागे आई, वडील, एक बहीण, असा परिवार आहे. अहमदनगर

संपादन - अशोक निंबाळकर

loading image