खासदार विखेंचे शिष्टमंडळ भेटले लष्करप्रमुखांना...केके रेंजचा प्रश्न घातला कानावर

takli.
takli.

टाकळी ढोकेश्वर : खासदार डाॅ.सुजय विखे पाटील यांनी आज (ता.१३) रोजी नवी दिल्ली येथे राष्ट्रीय सेना भवन येथे देशाचे लष्करप्रमुख मनोज नरवणे यांची के.के.के.रेंज जमीन अधिग्रहण विषयी भेट घेतली. याबाबत विखे हे माजी आमदार शिवाजी कर्डिले, जिल्हा परीषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील या शिष्टमंडळासमवेत या गावांमध्ये जाऊन लष्काराची भुमिका स्पष्ट करणार आहेत.

याबाबत माहिती अशी की, पारनेर, राहुरी, नगर तालुक्यातील २३ गावांचा के.के.रेंजमध्ये समावेश असून गेल्या काही दिवसांपासून सैन्य दलातील अधिकारी तेथे मोजमाप करताना दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर खासदार विखे यांच्यासह कर्डिले, झावरे हे दिल्लीमध्ये जाऊन यासंदर्भातील महत्त्वपूर्ण व्यक्तींची भेट घेत आहेत. बुधवारी संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांची भेट घेण्यात आली होती. त्यांनीही याबाबत राज्य सरकार सकारात्मक प्रतिसाद देत नसल्याचे सांगितले होते.

आज विखे यांनी लष्करप्रमुख नरवणे यांची भेट घेऊन के.के. रेंजविषयी असलेल्या शंका, प्रश्न व समस्यांविषयी प्रदीर्घ व सविस्तर चर्चा केली. तसेच यावेळी के.के.रेंज प्रश्नावर कशा प्रकारे तोडगा काढण्यात येईल. याबाबतीत देखील चर्चा झाली असून, तोपर्यंत लष्कराचे सराव, कार्यवाही थांबविण्याची विनंती नरवणे यांना विखे यांनी केली. याबाबत विखे यांनी सांगितले की, या सविस्तर चर्चेविषयी येत्या काही दिवसात के.के.रेंजमध्ये समाविष्ट असलेल्या पारनेर-नगर-राहुरी तालुक्यातील २३ गावात कर्डीले, झावरे यांच्यासह प्रत्यक्षात भेट देऊन भूमिका स्पष्ट करणार आहे. जेणेकरून केलेल्या पाठपुराव्याबद्दल नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण राहणार नाही.

संपादन - सुस्मिता वडतिले 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com